Home बातम्या 18GB रॅमसह आला OnePlus Ace 2 चा स्पेशल व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

18GB रॅमसह आला OnePlus Ace 2 चा स्पेशल व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition मध्ये कस्टम युआय आहे.
  • या फोनचा रियर पॅनल रेड कलरचा आहे
  • हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये OnePlus 11R नावानं लाँच करण्यात आला आहे.

OnePlus नं चीनमध्ये OnePlus Ace 2 लाँच केला होता. हा फोन ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शनमध्ये आला होता. कंपनीनं हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये OnePlus 11R 5G नावाने सादर केला होता. आता कंपनीनं चीनमध्ये या फोनचा स्पेशल व्हेरिएंट OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition बाजारात आणला आहे. हा फोन Xiangling कडून प्रेरणा घेतो, ज्याचा बॅक पॅनल लाल रंगाचा आहे आणि यात Genshin कॅरेक्टर इंस्पायर्ड थीम आणि साउंड इफेक्ट देण्यात आले आहेत. फोन वनप्लस आणि Genshin Impact टीमनं मिळून तयार केला आहे. यात काही कस्टम आयकॉन आणि वालपेपर्स मिळतात. पुढे आम्ही तुम्हाला फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहेत.

किंमत आणि उपलब्धता

OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition स्मार्टफोनच्या 18GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची चीनमध्ये किंमत 3699 युआन (सुमारे 44,145 रुपये) आहे. या स्पेशल एडिशन फोनची विक्री 24 एप्रिलपासून सुरु होईल. आता या फोनची प्री-ऑर्डर सुरु आहे.

वनप्लस एस 2 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ऑरिजनल Ace 2 सारखेच आहेत. वनप्लसचा हा फोन कस्टम गिफ्ट बॉक्ससह डिलिव्हर केला जाईल, ज्यात मेटॅलिक टेक्चर असलेला बॉक्स असेल. त्याचबरोबर बॉक्सचे पिन स्टेनलेस स्टील आणि जिंक अलॉएचे बनले आहेत. यात इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला. या बॉक्समध्ये Xiangling Lihua पोस्ट आणि Xiangling स्टीकर्स देखील मिळतील.

वनप्लस एस 2 5जी चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता चीनमध्ये हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.0 वर चालतो.

OnePlus Ace 2 मध्ये फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1450निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात.

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.