OnePlus Ace 3 आणि Ace 3V स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत आणि आता अशी माहिती आहे की, कंपनी या सीरीजचे ‘प्रो’ मॉडेल देखील आणणार आहे. OnePlus Ace 3 Pro चीनमध्ये जुलै महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हा एक फ्लॅगशिप फोन असेल जो हाय-एंड स्पेसिफिकेशन सह सुसज्ज असेल. एका नवीन लीकमध्ये, OnePlus Ace 3 Pro ची बॅटरी आणि चार्जिंग तंत्रज्ञान उघड झाले आहे. जे दर्शविते की, हा आगामी OnePlus स्मार्टफोन खूप कठीण आव्हान सादर करणार आहे.
OnePlus Ace 3 Pro ची बॅटरी आणि चार्जिंग
चायनीज टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने लीकमध्ये दावा केला आहे की, OnePlus Ace 3 Pro हा स्मार्टफोन 6100mAh बॅटरीवर लाँच होईल. लीकनुसार, ही अल्ट्रा-हाय-डेन्सिटी बॅटरी असेल जी पहिल्यांदाच कोणत्या तरी स्मार्टफोनमध्ये वापरली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅटरी तंत्रज्ञानाला CATL या नावाने ओळखल्या जाणाऱ्या Ningde Times चा सपोर्ट मिळेल.
तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी OnePlus Ace 3 Pro स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आल्याचे बोलले जात आहे. लीकमध्ये याचा खुलासा झालेला नाही. पण असा अंदाज आहे की, हा OnePlus स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करेल.
OnePlus Ace 3 चे स्पेसिफिकेशन
डिसप्ले: OnePlus Ace 3 हा स्मार्टफोन चीनमध्ये 6.7 इंचाच्या 1.5K डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा OLED ProXDR पॅनेल असलेला डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
परफॉर्मन्स: OnePlus Ace 3 या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे. तसेच यात 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळतो. त्याच वेळी हे डिव्हाईस ColorOS 14 आधारित Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते.
कॅमेरा: यातील रिअर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच यात 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड लेन्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: या OnePlus फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,500mAh बॅटरी आहे. त्याच वेळी हा डिव्हाईस चार्ज करण्यासाठी त्यामध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
इतर: हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्ट, 5G, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, एनएफसी, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, एक X-axis लिनियर मोटर आणि एक अलर्ट स्लाईडर यांसारख्या इतर अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
