वनप्लसच्या प्रेसिडेंटने काही दिवसांपूर्वी आपल्या ऐस सीरिज स्मार्टफोन OnePlus Ace 3V च्या लाँचला कंफर्म केले होते. परंतु लाँचची तारिख सांगण्यात आली नव्हती, परंतु हा या महिन्याच्या शेवटी सादर केला जाऊ शकतो. तसेच, लाँच तारिख येण्याच्या आधी वनप्लस ऐस 3वी चा रिअल लाईव्ह फोटो कंपनी प्रमुखाने शेअर केला आहे. चला, पुढे फोनचा लूक आणि संभावित फिचर्स माहितीमध्ये जाणून घेऊया.
OnePlus Ace 3V लाईव्ह फोटो डिझाईन
- वनप्लस चीनमध्ये प्रेसिडेंट ली जी ने OnePlus Ace 3V चा लाईव्ह फोटो शेअर केला आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की यात आगामी डिव्हाईसची फ्रंट डिझाईन समोर आली आहे.
- वनप्लस ऐस 3वी मध्ये डिस्प्लेवर सेल्फी काढण्यासाठी पंच होल कटआउट दिसला आहे.
- हा फोन चारही बाजूनी पातळ बेजेल्ससह दिसून येत आहे. ज्यानुसार यात हाई स्क्रीन टू बॉडी रेश्यो मिळण्याची शक्यता आहे.
- फोनमध्ये एक मोठी गोष्ट पाहण्यात आली आहे की हा अलर्ट स्लाईडरसह आहे, तर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या साईडवर देण्यात आले आहेत.
OnePlus Ace 3V चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- डिस्प्ले: OnePlus Ace 3V डिव्हाईसमध्ये युजर्सना कोणत्या आकाराचा डिस्प्ले मिळेल याची माहिती समोर आलेली नाही, परंतु हा हाई रिजॉल्यूशन असणारा 1.5K OLED स्क्रीन मध्ये येऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट सादर केला जाऊ शकतो.
- चिपसेट: फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट मिळण्याची चर्चा आहे. ही चिप येत्या 18 मार्चला सादर होऊ शकते.
- कॅमेरा: OnePlus Ace 3V स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, फ्रंट कॅमेऱ्यावर 16MP ची लेन्स मिळू शकते.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईलमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन दिले जाणार आहेत.
- बॅटरी: मोबाईलमध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. याला चार्ज करण्यासाठी 80W किंवा 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
- आणखी: फोनमध्ये एआय टेक्नॉलॉजी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स दिले जाणार आहेत.
- ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा नवीन वनप्लस फोन अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14 सह काम करू शकतो.
