OnePlus Nord 3 5 जुलैला भारतात लाँच होईल. ह्या फोन सोबतच कंपनी OnePlus Nord CE 3 5G फोन पण भारतीय बाजारात घेऊन येत आहे. वनप्लसनं अद्याप दोन्ही फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती सार्वजनिक केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नॉर्ड 3 5जी ची भारतातील किंमत समोर आली आहे.
OnePlus Nord 3 5G प्राइस (लीक)
वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनची किंमत टिपस्टर योगेश ब्रारनं शेयर केली आहे. इथे फोन व्हेरिएंट्सची ठोस किंमत तर देण्यात आली नाही परंतु असा दावा करण्यात आला आहे की ह्या मोबाइलची किंमत जवळपास 32,000 रुपयांपासून सुरु होऊन 37,000 रुपयांपर्यंत जाईल. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम मिळू शकतो.
OnePlus Nord 3 5G इंडिया लाँच
5 जुलैला ‘OnePlus Nord Summer Launch‘ इव्हेंटचं आयोजन केलं जात आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G फोनसह टीडब्ल्यूएस इअरबड्स OnePlus Nord Buds 2R भारतीय बाजारात येतील. हा लाँच इव्हेंट 5 जुलैला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.
OnePlus Nord 3 5G स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.74″ 1.5K AMOLED
- 80W 5,000mAh battery
- 16GB RAM+512GB Storage
- MediaTek Dimensity 9000
- 50MP Rear+16MP selfie Camera
- स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अॅमोलेड पॅनलसह 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
- प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच होऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डाइमेंसिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
- व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ह्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
- कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जो 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
- बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
