OnePlus ने आज अनेक दिवस चर्चेत राहिलेला स्मार्टफोन OnePlus Nord 5G लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात हा फोन अफॉर्डेबल किंमतीत प्रीमियम फीचर्स सह आला आहे. या बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सोबत कंपनीने TWS इयरबड्स वनप्लस बड्स पण सादर केले आहेत. पहिल्यांदाच वनप्लसने आपल्या इवेंटसाठी ऑग्युमेंटेड रियलिटी (AR) चा वापर केला आहे.
डिजाइन
वनप्लस नॉर्ड ऑल-ग्लास यूनिबॉडी डिजाइन वर सादर केला गेला आहे. तसेच हा डुअल पंच होल डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. पिल-शेप कटआउट फोन स्क्रीनच्या डावीकडे आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो. पुढे डुअल-पंच होल असल्यामुळे डिवाइसच्या चारही बाजूंना खूप कमी बेजल दिसतात. फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. मागे वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. कॅमेरा सेटअप पॅनेलच्या थोडा वर आला आहे, ज्या सोबत डुअल एलईडी फ्लॅश लाइट आहे.
दमदार कॅमेरा
फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यातील चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्र-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे.
सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला डुअल कॅमेरा आहे. यात पाहील कॅमेरा अपर्चर f/2.45 सह SonyIMX616 32 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा अपर्चर f/2.45 सह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे.
स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 5G 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनलेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44-इंचाच्या Fluid AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. तसेच यात प्रोटेक्शनसाठी फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे.
OnePlus Nord 5G कंपनी द्वारे एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो आक्सिजन ओएस सह काम करतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी आहे. ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो.
वनप्लस नॉर्ड कंपनीने तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात 6GB रॅम सह 64GB स्टोरेज, 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 12Gb रॅम सह 256GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे. हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई आहे. OnePlus च्या या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 30t वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4115एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.
किंमत
OnePlus Nord भारतात तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम/64GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये, 8GB रॅम/128GB स्टोरेजची किंमत 27,999 रुपये आणि 12GB रॅम/256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. वनप्लस नॉर्डचा सर्वात छोटा वेरिएंट 6GB रॅम/64GB सप्टेंबर मध्ये विक्रीसाठी येईल. तर 8GB रॅम/128GB आणि 12GB रॅम/256GB स्टोरेज वेरिएंटची विक्री 4 ऑगस्ट पासून अमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या वेबसाइट वर केली जाईल.
