OnePlus ब्रँडने टेक बाजाराच्या फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये स्वतःला हिट सिद्ध केले आहे आणि आता मिडबजेट व कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus Nord लॉन्च केला आहे जो ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. तसेच आता माहिती येत आहे कि कंपनी वनप्लस नॉर्ड सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस जोडण्याची योजना बनावट आहे ज्याची किंमत अजून कमी असू शकते. मोठी बातमी अशी आहे कि वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट झाला आहे.
OnePlus Nord सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन कंपनी द्वारे अमेझॉन इंडियाने टीज केला आहे. इथे फोनचा प्रोडक्ट पेज तर बनला नाही पण वनप्लस नॉर्डच्या पेज वरच हॅशटॅग ‘कमिंग सून’ लिहून नवीन लॉन्चची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने या नवीन फोनचे नाव सांगितले नाही पण रिपोर्ट्सनुसार हा नवीन वनप्लस फोन OnePlus Nord N10 नावाने लॉन्च केला जाईल. तसेच असे पण समजले आहे कि नॉर्ड एन10 ची विक्री अमेझॉन इंडिया वरच होईल.
OnePlus Nord N10
लीक्स की मानें तो वनप्लस नॉर्ड एन10 एक 5G फोन असेल आणि याची किंमत 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये असू शकते. लीक मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला गेला होता त्यानुसार हा फोन 6.49 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा डिस्प्ले नॉच सह येईल कि पंच-होल हे अजून स्पष्ट झाले नाही. अशा आहे कि वनप्लस फोन मध्ये एमोलेड पॅनलचा वापर करेल.
वनप्लस नॉर्ड एन10 5जी बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह क्वॉलकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6 जीबी रॅम मेमरी मिळू शकते त्याचबरोबर 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. OnePlus Nord N10 एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो.
लीकनुसार हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस OnePlus Nord N10 च्या रियर पॅनल वर मिळू शकते. OnePlus Nord N10 च्या लॉन्च डेट आणि ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.
