OnePlus ने जुलै मध्ये मिड बजेट सेग्मेंट मध्ये आपला विस्तार करत OnePlus Nord स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीने हा फोन 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आणला होता त्यानंतर हा वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला होता. या फोनच्या माध्यमातून वनप्लसने आपली ‘नॉर्ड’ सीरीज टेक मंचावर सादर केली होती. आज ग्लोबल मार्केट मध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीने अजून दोन नवीन स्मार्टफोन OnePlus Nord N100 आणि OnePlus Nord N10 5G पण लॉन्च केले आहेत.
लुक आणि डिजाईन
सर्वप्रथम OnePlus Nord N10 5G ची डिजाईन पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. फोनची स्क्रीन पूर्णपणे बेजल लेस आहे ज्याच्या खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. डिस्प्ले वर डावीकडे होल देण्यात आला आहे ज्यात फोनचा सेल्फी कॅमेरा फिट आहे. वनप्लस नॉर्ड एन10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये कॅमेरा सेंसर ‘L’ शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. बऱ्याच दिवसांनी OnePlus फोन मध्ये असा फिंगरप्रिंट सेंसर दिसला आहे.
OnePlus Nord N10 5जी च्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. तसेच फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सोबतच स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. फोटो मध्ये फोनचा रियर पॅनल खूप शाइनी दिसत आहे पण हा कोणत्या मटेरियलचा बनला आहे, हि माहिती वनप्लस कंपनीने सांगितली नाही.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
वनप्लसने आपला हा नवीन फोन 6.49 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह काम करतो. जसे नावावरून समजते कि OnePlus Nord N10 5G कंपनी द्वारे लॉन्च केला गेलेला एक 5जी स्मार्टफोन आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्सिजन ओएस सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह 5जीला सपोर्ट करणारा क्वॉलकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord N10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा नवीन वनप्लस स्मार्टफोन 119डिग्री एफओवी ची क्षमता असलेल्या अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो. फोन मध्ये एक मॅक्रो लेंस आणि एक मोनोक्रोम लेंस पण देण्यात आला आहे ज्यांची एमपी पावर आता समोर आली नाही. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस नॉर्ड एन10 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OnePlus Nord N10 5G मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन डुअल स्पीकर सह येतो जे चांगला स्टीरियो साउंड इफेक्ट देतात. तसेच पावर बॅकअपसाठी वनप्लसने आपला हा फोन 4,300एमएएच च्या बॅटरी सह येतो जो Warp Charge 30T फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.
वेरिएंट्स व किंमत
OnePlus Nord N10 5G अमेरिकन मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512जीबी पर्यंत वाढवता येते. यूएस मध्ये हा फोन Midnight Ice कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत £329 म्हणजे भारतीय करंसीनुसार 31,500 रुपयांच्या आसपास आहे.
