Home बातम्या OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर; स्नॅपड्रॅगन 695 आणि 8जीबी रॅमचा खुलासा

OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर; स्नॅपड्रॅगन 695 आणि 8जीबी रॅमचा खुलासा

Highlights
  • OnePlus Nord N30 5G ला सिंगल कोरमध्ये 888 आणि मल्टि कोरमध्ये 2076 पॉईंट्स मिळाले आहेत.
  • गिकबेंचच्या लिस्टिंगवरून वनप्लस फोनमधील अँड्रॉइड 13 ओएस, 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा खुलासा
  • OnePlus Nord N30 हा यूएसमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G नावानं आला आहे.

OnePlus Nord N30 ची चर्चा गेली कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहे. आता हा स्मार्टफोन गिकबेंचवर दिसला आहे. ह्याआधी हा एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. हा यूएसमधील OnePlus Nord CE 3 Lite चा रीब्रँड व्हर्जन आहे.

OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर

]

OnePlus Nord N30 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : OnePlus Nord N30 5G फोनमध्ये 6.72-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 1080 X 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, सेल्फीसाठी पंच होल कट आऊट, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 91.40 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास लेयर आणि 680निट्झ पर्यंत पीक ब्राइटनेस मिळू शकते.

    चिपसेट : वनप्लस फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट ताकद मिळू शकते आणि जोडीला अड्रेनो 619 जीपीयू मिळू शकतो.

    रॅम आणि स्टोरेज : ह्या हँडसेटमध्ये 8जीबी LPDDR4x RAM आणि 128GB/256GB UFS 2.2 स्टोरेज मिळू शकते.

    • ओएस वनप्लस नॉर्ड एन30 5जी मध्ये 13 आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो.
    • कॅमेरा : OnePlus Nord N30 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, जात 108MP Samsung HM6 मुख्य कॅमेरा, 6पी लेन्स, EIS, एलईडी फ्लॅश आणि एफ/1.75 अपर्चर, 2MP चा डेप्थ आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. तर फ्रंटला 16MP चा कॅमेरा आहे.
    • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटी साठी ह्यात 5जी, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप सी आणि 3.5एमएम जॅक मिळालं.
    • बॅटरी : ह्या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट सुपर ऊक फास्ट चार्जिंगसह मिळू शकतो.