Home बातम्या OnePlus ने केली की नवीन 5G फोन आणण्याची तयारी, मिड रेंज बजेटमध्ये लॉन्च होईल वनप्लस Nord CE

OnePlus ने केली की नवीन 5G फोन आणण्याची तयारी, मिड रेंज बजेटमध्ये लॉन्च होईल वनप्लस Nord CE

OnePlus NOrd

टेक कंपनी OnePlus बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी आपला नवीन मिड रेंज कॅटेगरीच्या 5G फोनवर काम करत आहे. आतापर्यंत लीक्समध्ये सांगण्यात आले होते कि अपकमिंग फोनचे नाव OnePlus Nord N11 5G असेल. पण, आता नवीन लीकनुसार हा अपकमिंग डिवाइस OnePlus Nord CE 5G या नावाने सादर केला जाईल. एका प्रसिद्ध टिप्स्टरने माहिती दिली आहे कि वनप्लसच्या आगामी मिड रेंज 5जी स्मार्टफोन OnePlus Nord CE 5G स्वरूपात लॉन्च केला जाईल, ज्याची वैशिष्टये वनप्लस नॉर्ड एन10 5जी सारखी असतील. चला जाणून घेऊया या आगामी हँडसेटबाबत अजून कोणती नवीन माहिती समोर आली आहे. (Oneplus to launch mid range phone Nord N10 5G)

OnePlus Nord CE 5G

याआधी अनेक नावांबाबत चर्चा सुरु होती कि अपकमिंग फोनचे नाव OnePlus Nord N11 5G आणि OnePlus Nord N20 5G असेल. पण, आता जाहिर झाले आहे कि वनप्लसचा आगामी मिड रेंज फोन वनप्लस नॉर्ड सीई 5जी असेल. कंपनीने आपल्या नवीन 5जी मोबाईलबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

टिपस्टरने या अपकमिंग OnePlus Nord CE 5Gबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही. डिवाइसबाबत ऑनलाइन पण काही जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, नवीन लीकमधून स्पष्ट झाले आहे कि हा नॉर्ड N10 5G ची जागा घेईल. OnePlus Nord N10 5G यूरोप आणि उत्तर अमेरिकेत लाँच केला गेला होता. तसेच, बोलले जात आहे कि OnePlus Nord CE 5G भारतात लॉन्च होईल.

OnePlus Nord N10 5G

नॉर्ड एन10 6.49 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह काम करतो. हा एक 5जी स्मार्टफोन आहे जो अँड्रॉइड 10 आधारित आक्सिजन ओएससह क्वॉलकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेटवर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512जीबी पर्यंत वाढवता येते.

OnePlus Nord N10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. ज्याच्या सोबत 119डिग्री एफओवी क्षमता असलेली अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एक मॅक्रो लेंस आणि एक मोनोक्रोम लेंस पण आहे. या सेंसर्सची एमपी पावर अजूनही समोर आली नाही. अश्याप्रकारे सेल्फीसाठी वनप्लस नॉर्ड एन10 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी वॉर्प चार्ज 30टी टेक्नॉलॉजी असलेली 4,300एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.