Home बातम्या जियो नव्हे एयरटेल आहे भारतातील सर्वात फास्ट 4जी नेटवर्क, रिपोर्ट मधून झाला खुलासा

जियो नव्हे एयरटेल आहे भारतातील सर्वात फास्ट 4जी नेटवर्क, रिपोर्ट मधून झाला खुलासा

इंडियन टेलीकॉम बाजारात जेव्हा पासून जियोची एंट्री झाली आहे तेव्हापासूनच टॅरिफ प्लान, पॅकेज रेट आणि इंटरनेट डेटाची परिस्थिती सर्वकाही बदलले आहे. रिलायंस जियोच एकमात्र अशी इंडियन कंपनी आहे जी फक्त 4जी नेटवर्क वरच आपली सर्विस देते. जियोची ओळखच 4जी इंटरनेट डेटा मुळे झाली आहे. रिलायंस जियोचा यूजरबेस वेगाने वाढत आहे एवढा वेग क्वचितच दुसऱ्या कंपनी मध्ये दिसला असेल. पण एका ताजा रिपोर्ट मध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे कि देशात सर्वात वेगवान 4जी नेटवर्क रिलायंस जियोचे नसून एयरटेलचे आहे.

टेलीकॉम बाजारावर नजर ठेवणारी फर्म ओकला ने आपला लेटेस्ट रिपोर्ट शेयर केला आहे आणि या रिपोर्ट मधूनच हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ओकला ने आपल्या रिपोर्ट मध्ये भारतातील 4जी नेटवर्कची माहिती दिली आहे. या रिपोर्ट मध्ये देशातील 4जी नेटवर्कची उपलब्धता आणि 4जी नेटवर्कच्या स्पीडचा लेखा जोखा नोंदवण्यात आहे. विशेष म्हणजे देशातील 4जी नेटवर्कच्या उपलब्धता पाहता जियो अव्वल आहे, पण जेव्हा 4जी नेटवर्कच्या स्पीडचा विषय येतो तेव्हा जियोला मागे टाकत एयरटेलने बाजी मारली आहे.

साल 2018 मध्ये भारतीयांनी खरेदी केले 1423 लाख स्मार्टफोन (1,42,30,00,000), शाओमीने पुन्हा प्रथम

कोणता आहे सर्वात वेगवान 4जी नेटवर्क
ओकलाच्या रिपोर्टनुसार भारतात एयरटेलचा 4जी नेटवर्क सर्वात वेगवान आहे. निर्धारित काळात एयरटेल ने आपल्या 4जी नेटवर्क वर सर्वात जास्त 11.23 एमबीपीएस चा स्पीड दिला आहे. या लिस्ट मध्ये दुसरा नंबर वोडाफोनचा आला आहे, या कंपनीचा 4जी स्पीड 9.13 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे. रिलायंस जियोला 4जी स्पीड मध्ये तिसरे स्थान मिळाले आहे. रिलायंस जियोच्या नेटवर्क वर 7.11 एमबीपीएस चा 4जी स्पीड मोजण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 7.02 एमबीपीएस स्पीड सह आइडिया या यादीत चौथ्या नंबर वर आहे.

कोणत्या कंपनीचा 4जी सिग्नल मिळतो सर्वात जास्त ठिकाणी
जी कंपनी सर्वात फास्ट 4जी इंटरनेट देते तिचे नेटवर्क प्रत्येक ठिकाणी मिळेल हे गरजेचे नाही. ओकलाच्या रिपोर्टने हे पण स्पष्ट केले आहे. जरी एयरटेल सर्वात वेगवान 4जी इंटरनेट स्पीड देत असली तरी अनेक ठिकाणी एयरटेलचा 4जी नेटवर्क बिल्कुल पण येत नाही. ओकला ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि रिलायंस जियो अशी कंपनी आहे जिचा 4जी नेटवर्क सर्वात जास्त ठिकाणी मिळतो आणि सर्वात जास्त मिळतो.

2019/02/12 सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा

रिपोर्टनुसार रिलायंस जियोचा 98.8 टक्के 4जी सिग्नल प्रत्येक ठिकाणी मिळतो. तर एयरटेलच्या 4जी नेटवर्कची उपलब्धता पाहता 90.0 टक्केच एयरटेलचा सिग्नल मिळतो. या लिस्ट अनुसार एक झालेली वोडाफोन आणि आइडिया एयरटेल व जियो पेक्षा खूप मागे आहे. वोडाफोनच्या 4जी नेटवर्क वर 84.6 टक्के सिग्नल प्राप्त मिळतो तर आइडिया च्या 4जी नेटवर्क वर फक्त 82.8 टक्के सिग्नल मिळतो.

लक्षात असू दे वरील 4जी स्पीड कंपनीच्या नेटवर्क वर डाउनलोड आणि अपलोड मिळून सांगण्यात आला आहे. हे आकडे साल 2018 च्या ​अंतिम तिमाहीतले आहेत. जास्त नेटवर्क उपलब्धता असून कमी स्पीड देणाऱ्या जियो बद्दल ओकला म्हणते कि जियोच्या नेटवर्क वर यूजर्सची जास्त गर्दी झाल्यामुळे तसेच जियो सिम हलक्या किंवा स्लो प्रोसेसिंग असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये वापरल्यामुळे हा स्पीड कमी झाला असेल.