Home बातम्या 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 90हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन OPPO A33 भारतात लॉन्च

5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 90हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन OPPO A33 भारतात लॉन्च

OPPO च्या नवीन स्मार्टफोन ओपो ए33 चा एक पोस्टर कालच इंटरनेट वर लीक झाला होता, ज्यात फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सोबतच याची किंमत पण शेयर करण्यात आली होती. हा मोबाईल गेल्या महिन्यात इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला होता जो मोठी बॅटरी, लार्ज डिस्प्ले आणि शानदार लुक सह येतो. हा फोन मिड बजेट मध्ये आला होता जो आज भारतीय बाजारात पण अनाउंस करण्यात आला आहे. OPPO A33 अधिकृतपणे भारतात लॉन्च झाला आहे जो 11,990 रुपयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

OPPO A33

ओपो ए33 कंपनीने 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच सुरक्षेसाठी ओपोने कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

OPPO A33 कंपनीने अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 7.2 वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. इंडोनिशयन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : OPPO A15 भारतात लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये आहे 4230एमएएच बॅटरी, 13एमपी कॅमेरा आणि 3जीबी रॅम

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A33 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या पंच-होल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A33 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए33 मध्ये 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.