OPPO ने काल ग्लोबल मार्केट मध्ये आपला अजून एक नवीन मिड बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन ‘ए सीरीज’ मध्ये जोडला आहे ज्याने OPPO A33 नावाने एंट्री घेतली आहे. मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि शानदार लुक असलेला हा मोबाईल फोन सध्या इंडोनेशिया मध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये एंट्री घेऊ शकतो. ओपो ए33 भारतात कधी लॉन्च होईल हि माहिती तर अजूनतरी मिळाली नाही, पण पुढे आम्ही या नवीन ओपो फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स समवेत इतर माहिती दिली आहे.
OPPO A33
ओपो ए33 कंपनीने 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच सुरक्षेसाठी ओपोने कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.
OPPO A33 कंपनीने अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 7.2 वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. इंडोनिशयन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A33 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या पंच-होल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO A33 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए33 मध्ये 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
OPPO A33 इंडोनेशिया मध्ये 4 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला आहे ज्याची किंमत Rp 2,299,000 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 11,300 रुपये आहे. हा फोन Moonlight Black आणि Mint Cream कलर मध्ये बाजारात आला आहे. ओपो आपला नवीन फोन भारतात कधी लॉन्च करेल या माहितीसाठी थोडी वाट बघावी लागेल.
