Categories: बातम्या

ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च

मागच्या आठवड्यात टेक कंपनी ओपो ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला नवीन नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे. पण आता बातमी समोर येत आहे की कंपनी हा स्मार्टफोन या महिन्यात भारतीय बाजारात पण लॉन्च करू शकते आणि देशात हा स्मार्टफोन ए3एस नावाने सादर होईल.

गॅजेट360 ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की ओपो लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन ए3एस लॉन्च करणार आहे. रिपोर्ट नुसार देशात हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 2जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए5 चे स्पेसिफिकेशन्स गॅजेट360 द्वारा सांगण्यात आलेल्या ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स शी मिळते जुळते आहेत. त्यामुळे असे म्हणू शकतो की कदाचित ओपो कंपनी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ए5 ला भारतात ए3एस नावाने सादर करेल. रिपोर्ट मध्ये या फोन मध्ये 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी मेमरी असल्याचे सांगितले आहे तर चीन मध्ये ओपो ए5 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला आहे.

ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर केला जाऊ शकतो ज्या सोबत 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

रिपोर्ट नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. पण तरीही ए3एस साठी ओपो अधिकृत घोषणा व मीडिया इन्वाईट ची वाट बघितली जात आहे.

Published by
Siddhesh Jadhav