ओप्पोने भारतीय युजर्सना भेट देत मात्र 12,499 च्या किंमतीत Oppo A3x 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन मोबाईलमध्ये ग्राहकांना मिलिट्री ग्रेड शॉक रेजिस्टेंस टेक्नॉलॉजी मिळेल. यात मिळणारी असलेला मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट, 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज, 8 जीबी पर्यंत रॅम, 5000mAh बॅटरी सारखे अनेक वैशिष्ट्ये फोनला चांगले पर्याय बनविते. चला, पुढे मोबाईलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Oppo A3x 5G ची किंमत आणि उपलब्धता
- Oppo A3x 5G भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. डिव्हाईसचे बेस मॉडेल 4GB रॅम +64GB स्टोरेजची किंमत मात्र 12,499 रुपये आहे.
- टॉप मॉडेल 4GB रॅम +128GB पर्याय फक्त 13,499 रुपयांना आहे.
- हा स्टारी पर्पल, स्पार्कल ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट सारख्या तीन कलरमध्ये आला आहे. फोनची सेल 7 ऑगस्टपासून ओप्पो वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेटवर सुरु होईल.
- ऑफर अंतर्गत ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट बँक कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर 6 महिन्याचा नो-कॉस्ट EMI ऑप्शन पण दिला जाईल.
Oppo A3x 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.67 इंचाचा LCD HD+ डिस्प्ले
- Dimensity 6300 SoC
- 4GB RAM
- 4GB एक्सटेंटेड RAM
- 128GB स्टोरेज
- 8 MP रिअर कॅमेरा
- 5100 एमएएच बॅटरी
- 44 W फास्ट चार्जिंग
- IP54 रेटिंग
- डिस्प्ले: ओप्पो ए 3 एक्स 5 जी मध्ये 6.67 इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 1604 × 720 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स अधिकतम ब्राईटनेस आणि 89.9% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो काला सपोर्ट मिळतो.
- चिपसेट: Oppo A3x 5G मोबाईलमध्ये ब्रँडने MediaTek Dimensity 6300 SoC लावली आहे. तर ग्राफिक्ससाठी 1072 मेगाहर्ट्सवर क्लॉक केलेली माली G57 MC2 GPU सह जोडला आहे.
- स्टोरेज: नवीन ओप्पो फोन 4GB LPDDR4X RAM, 4GB एक्सटेंटेड RAM आणि 128GB पर्यंत eMMC 5.1 इंटरनल स्टोरेजसह आहे.
- कॅमेरा: कॅमेरा पाहता फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याच्या बॅक पॅनलमध्ये 8MP (f/2.0) OV08D10 सेन्सर, FOV 78°, AF ला सपोर्टसह 4P लेन्स आणि ओपन-लूप फोकस मोटर देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा लेन्स आहे.
- बॅटरी: Oppo A3x 5G फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5100 एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.
- ओएस: Oppo A3x 5G मोबाईल Android 14 आधारित ColorOS 14.0.1 वर चालतो.
- इतर: कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम, 5 जी, 4 जी, वायफाय 5, ब्लूटूथ V5.3, यूएसबी टाईप-सी, 3.5 मिमी ऑडियो जॅकला सपोर्ट आहे. तर सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर, फेस रिकग्निशन सपोर्ट, MIL-STD 810 मिलिट्री ग्रेड शॉक रेजिस्टेंस, अनेक तरल प्रतिरोध टेस्ट आणि IP54 रेटिंग देण्यात आली आहे.
- वजन आणि डायमेंशन: Oppo A3x 5G डिव्हाईसचे वजन 187 ग्रॅम आणि याची जाडी 0.77 सेमी आहे.
