Home बातम्या 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन

5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन

OPPO ने सप्टेंबर मध्ये भारतात आपली ‘ए’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आले होते जे आज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहेत. मागे OPPO ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत A9 2020 स्मार्टफोनची किंमत कमी केली होती आणि या फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी झाली होती. आता कंपनीने या सीरीजच्या दुसऱ्या फोन Oppo A5 2020 ची किंमत पण कमी केली आहे.

Oppo A5 2020 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी होती. Oppo ने या फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये प्राइज कटची घोषणा केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यावर हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo A5 2020

स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A5 2020 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A5 2020 दोन वेरिंएट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Oppo A5 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत Oppo A5 2020 मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A9 2020 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम + 128जीबी वेरिएंटचा समावेश आहे. अलीकडेच Oppo ने फोनच्या 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली होती. ज्यामुळे 16,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा वेरिएंट 15,990 सेल साठी उपलब्ध आहे. तर फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.