OPPO ने गेल्याच महिन्यात भारतात आपली ‘ए’ सीरीज वाढवत OPPO A54 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 13,490 रुपयांच्या आरंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आलेला हा फोन एक 4G मोबाईल आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सारख्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. इंडियन मार्केट नंतर आता ओपोने आपल्या याच फोनचा 5G मॉडेल पण टेक मंचावर सादर केला आहे. OPPO A54 5G यूरोपियन बाजारात लॉन्च केला गेला आहे ज्याने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेटसह एंट्री घेतली आहे. (OPPO A54 5G Phone officially launched Specs Price Sale Offer)
Oppo A54 5G
ओपो ए54 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Oppo A54 5G चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आहे तसेच फोनची स्क्रीन 405पीपीआई पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित
Oppo A54 5G अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्चॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओपो फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो. यूरोपियन मार्केटमध्ये ओपो ए54 5जी 4 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A54 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेलय 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
हे देखील वाचा : Oppo ने दिला Xiaomi, Realme आणि Samsung ला जबरदस्त धक्का, कमी केली दमदार स्मार्टफोनची किंमत
Oppo A54 5G डुअल सिम फोन आहे ज्यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी जिथे साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जो 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओपो ए54 5जी फोनची आंतरराष्ट्रीय किंमत EUR 219 म्हणजे 19,500 रुपयांच्या आसपास आहे जो Fantastic Purple आणि Fluid Black कलरमध्ये आला आहे.
