Home बातम्या फक्त 2490 रुपयांमध्ये मिळवा 12,000 रुपयांच्या OPPO A5; पुन्हा मिळणार नाही अशी संधी

फक्त 2490 रुपयांमध्ये मिळवा 12,000 रुपयांच्या OPPO A5; पुन्हा मिळणार नाही अशी संधी

जर तुम्ही कमी किंमतीत जास्त रॅम व मोठी बॅटरी असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक अशा ऑफरची माहिती देणार आहोत. OPPO चा किफायतशीर OPPO A54 स्मार्टफोन सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या Best Deal चा फायदा घेऊन तुम्ही 6GB RAM आणि 5000mAh Battery असलेला हा डिवाइस सर्व डिस्काउंट ऑफर्सनंतर फक्त 2,940 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर अविश्वसनीय आहे म्हणून पुढे आम्ही तुम्हाला या ऑफरसह Oppo A54 ची किंमत आणि फीचर्सची देखील माहिती दिली आहे.

अशाप्रकारे 2940 रुपयांमध्ये मिळेल हा फोन

सध्या अ‍ॅमेझॉनवर हा डिवाइसवर 33 टक्के म्हणजे 6,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या सवलतींमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉमवरून Oppo A54 चा 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 11,990 रुपयांमध्ये कोणत्याही अटींविना विकत घेता येईल. परंतु जर तुम्ही हा फोन विकत घेताना तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर या फोनसह 9,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून हा नवीन हँडसेट फक्त 2490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

एक्सचेंज व्हॅल्यू कशी जाणून घ्यायची

9050 रुपये ही कमाल एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही तुमच्या जुन्या फोनचा मॉडेल नंबर आणि ब्रँड डिटेल्स टाकून त्यावर किती डिस्काउंट मिळतोय हे जाणून घेऊ शकता. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास ग्राहकांना 2,940 रुपयांमध्ये हा फोन मिळेल. तसेच तुम्हाला 100 रुपये एक्सचेंज फी द्यावी लागेल.

EMI वर देखील मिळेल Oppo A54

Oppo A54 फोन EMI वर देखील विकत घेता येईल. हा फोन 564 रुपयांच्या मासिक हप्त्यावर उपलब्ध आहे. HSBC Cashback Card Credit Card च्या माध्यमातून हा हँडसेट विकत घेतल्यास 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच नो कोस्ट ईएमआयचा पर्याय देखील काही कार्ड्सवर उपलब्ध आहे.

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. ओप्पोचा हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह चालतो. सोबतीला कंपनीनं 6GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी यात microSD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, सोबतीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते.