OPPO ने एप्रिल महिन्यात भारतीय बाजारात आपली ‘ए सीरीज’ वाढवत Oppo A1K आणि Oppo A5S स्मार्टफोन लॉन्च केले होते. Oppo A5S वॉटरड्रॉप नॉच आणि डुअल कॅमेरा असलेला लो बजेट स्मार्टफोन आहे जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे. Oppo A5S कंपनी द्वारा तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी, 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीचा समावेश आहे. आता आपल्या फॅन्सना भारत देत कंपनी Oppo A5S च्या किंमतीत मोठी कपात करणार आहे.
91मोबाईल्सला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि ओपो कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन Oppo A5S च्या किंमतीत कपात करणार आहे. Oppo हि कपात सध्या फक्त Oppo A5S च्या 4जीबी रॅम वेरिएंट मधेच करेल. Oppo A5S चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट देशात 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता किंमत कमी झाल्यानंतर हा डिवाईस 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बातमी लिहण्याआधी Oppo A5S अमेझॉन व फ्लिपकार्ट वर 12,990 रुपयांमध्ये लिस्ट होता, पण आता हा वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
किंमत
Oppo A5S च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती पाहता फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट आज पासून 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट देशात 9,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे Oppo A5S चा सर्वात छोटा वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या वेरिएंट मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo A5S मार्केट मध्ये रेड, ब्लॅक, ग्रीन आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
डिजाइन
Oppo A5S कंपनी द्वारा बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Oppo A5S डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे हारिजॉन्टल शेप मध्ये आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
ओपो ए5एस वीडियो
