ओप्पोने ग्लोबल बाजारात आपल्या A3 सीरीजचा विस्तार केला आहे. यानुसार नवीन मोबाईल Oppo A60 5G यूएई मध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच याआधी याला सर्टिफिकेशन वेबसाईटवर पण पाहिले गेले आहे. हा भारतीय बाजारात लाँच केलेल्या A3 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे. यात युजर्सना 5100mAh बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट, 50 मेगापिक्सल कॅमेरा सारखे अनेक स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. चला, पुढे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.
Oppo A60 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- डायमेंसिटी 6300 चिपसेट
- 6GB रॅम +128 जीबी स्टोरेज
- 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 5100mAh बॅटरी
- 45 वॉट सुपरवूक चार्जिंग
- Android 14
डिस्प्ले: Oppo A60 5G मध्ये कंपनीने 6.67 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले प्रदान केला आहे. यावर युजर्सना 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्टची सुविधा मिळते.
चिपसेट: फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी कंपनीने मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट दिली आहे. या चिपसह Mali-G57 MC2 जीपीयू पण लावली आहे. ज्यामुळे युजर्सना चांगली ग्राफिक आणि गेमिंग अनुभव होईल.
स्टोरेज आणि रॅम: Oppo A60 5G फोनमध्ये कंपनीने डेटा सेव्ह करणे आणि स्पीडसाठी 6GB LPDDR4X रॅम तसेच 128 जीबी eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे. डिव्हाईसमध्ये व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या मदतीने 6GB पर्यंत रॅम वाढवता येईल म्हणजे की एकूण मिळून ग्राहक 12 जीबी पर्यंतचा उपयोग करू शकतील.
कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता नवीन ओप्पो मोबाईलमध्ये रिअर पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा एएफ सेन्सर मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: फोनला चालवण्यासाठी ब्रँडने यात 5100mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. ज्यामुळे युजर्सना चांगला बॅकअप मिळतो. तसेच, याला चार्ज करण्यासाठी 45 वॉट सुपरवूक चार्जिंगची सुविधा मिळते.
इतर: हा डिव्हाईस ड्युअल सिम 5G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाईप सी-पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅकसह येतो. त्याचबरोबर यात मिलिट्री ग्रेड शॉक रेजिस्टेंस आणि लिक्विड रेजिस्टेंस टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला आहे. तर सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस रिकॉग्निशनला सपोर्ट पण आहे.
वजन आणि डायमेंशन: Oppo A60 5G डिव्हाईसचे वजन आणि डायमेंशन पाहता हा जवळपास 7.7 एमएम आणि 187 ग्रॅम आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: Oppo A60 5G स्मार्टफोन ब्रँडच्या ColorOS 14.0.1 सह लेटेस्ट Android 14 ओएसवर आधारित ठेवला गेला आहे.
Oppo A60 5G ची किंमत
- नवीन मोबाईल Oppo A60 5G यूएईच्या अॅमेझॉन वेबसाईटवर लिस्टेड आहे.
- फोनच्या सिंगल स्टोरेज 6GB पर्यंत रॅम +128 जीबी ऑप्शनची किंमत AED 678 म्हणजे जवळपास 15,000 रुपये आहे.
- डिव्हाईससाठी युजर्सना नेबुला रेड आणि ओसियन ब्लू सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.
