Categories: बातम्या

OPPO A60 स्पेसिफिकेशनसह आला समोर, लवकर घेऊ शकतो मार्केटमध्ये एंट्री

टेक ब्रँड ओप्पो आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीमध्ये आहे ज्याला OPPO A60 नावाने लाँच केले जाईल. हा ओप्पो मोबाईल गुगल प्ले कंसोलवर स्पॉट झाला आहे, जिथे लाँचच्या आधी ही अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन तसेच फिचर्सची माहिती समोर आली आहे. हा भारतात विकला जाणाऱ्या ओप्पोच्या सर्वात स्वस्त 5 जी फोन OPPO A59 5G च्या अपग्रेडेड व्हर्जनच्या रूपामध्ये एंट्री घेऊ शकतो.

OPPO A60 गुगल प्ले लिस्टिंग

  • हा अगामी ओप्पो मोबाईल गुगल प्ले कंसोलवर OPPO OP5AE7L1 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
  • प्ले कंसोलवर स्मार्टफोनमध्ये 8GB RAM दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • लिस्टिंगनुसार हा फोन सर्वात नवीन अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम Android 14 सह लाँच होईल.
  • OPPO A60 मध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट दिला जाणार असल्याची बातमी लिस्टिंगमध्ये मिळाली आहे. म्हणजे हा एक 4G Phone असेल.
  • या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल ज्यात 4 2.4GHz Cortex A73 कोर आणि 4 1.9GHz Cortex A53 कोर सामिल होतील.
  • गुगल प्ले कंसोलवर माहिती समोर आली आहे की ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Adreno 610 GPU दिला जाईल.
  • OPPO A60 स्मार्टफोन पंच-होल स्टाईल असणाऱ्या स्क्रीनवर लाँच होईल ज्यात 720 x 1604 पिक्सल रेजोल्यूशन असणारी स्क्रीन मिळेल. यावर 320DPI पिक्सल डेनसिटी मिळेल.

OPPO A60 लाँच टाईमलाईन (अंदाजे )

ओप्पो ए60 बद्दल आतापर्यंत ब्रँडकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या फोनबाबत अधिक लीक व सर्टिफिकेशनची माहिती पण आतापर्यंत समोर आलेली नाही. अपेक्षा केली जात आहे की कंपनी वर्षाच्या पहली सहा महिन्यामध्ये हा फोन बाजारात आणू शकते. OPPO A60 मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो.

OPPO A60 किंमत (अंदाजे)

गुगल प्ले कंसोलवर समोर आलेले स्पेसिफिकेशन पाहता मानले जात आहे की ओप्पो ए60 एक लो बजेट स्मार्टफोन असेल. हा ओप्पो मोबाईल भारतात 15 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आणला जाऊ शकतो. फोनचा बेस व्हेरिएंट रेट जवळपास 12,999 रुपये तसेच लिस्टिंगमध्ये 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपयांच्या आसपास पाहायला मिळू शकते.

Published by
Kamal Kant