OPPO ने गेल्याच आठवड्यात वियतनाम मध्ये आपला नवीन स्मार्टफोन OPPO A93 लॉन्च केला होता. ‘ए सीरीज’ मध्ये जोडलेला हा फोन भारतात लॉन्च झालेल्या Oppo F17 Pro सारख्या लुक आणि स्पेसिफिकेशन्स सह आला होता. आता ओपोने इंटरनेशनल मार्केट मध्ये आपला अजून एक आणि नवीन मोबाईल फोन OPPO A73 नावाने लॉन्च केला आहे. हा फोन सध्या ट्यूनेशियाच्या बाजारात आला आहे जो भारतात लॉन्च झालेल्या Oppo F17 चा रि-ब्रँडिड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.
OPPO A73
ओपो ए73 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. ओपो ए73 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे तसेच फोनचे डायमेंशन 159.8 x 72.9 x 7.45एमएम आणि वजन 163ग्राम आहे.
OPPO A73 अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. ट्यूनेशिया मध्ये ओपो ए73 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए73 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 119डिग्री FOV असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची रेट्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या Sony IMX471 सेंसरला सपोर्ट करतो.
OPPO A73 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. पावर बॅकअपसाठी ओपो ए73 मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,015एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Navy Blue आणि Classic Silver कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत समोर आली नाही.
