टेक कंपनी ओपो ने घोषणा केली आहे कि ते येत्या 5 मार्चला भारतात आपली एफ स्मार्टफोन सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन सादर करेल तसेच हा एफ11 प्रो नावाने बाजारात येईल. ओपो एफ11 प्रो च्या लॉन्च डेटची घोषणा करण्यासोबत असे पण सांगण्यात आले आहे कि या स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळेल. तसेच आता ओपो ने एक आफिशियल वीडियो शेयर करत एफ11 प्रो च्या लॉन्चच्या आधी याच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे.
ओपो इंडिया ने एफ11 प्रो चा एक वीडियो जाहीर केला आहे ज्यात फोनच्या सर्व महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला आहे. ओपो एफ11 प्रो चा हा वीडियो आगामी हॉलीवुड मुव्ही कॅप्टन मारवल सोबत बनवण्यात आला आहे. या वीडियो मध्ये एकीकडे कॅप्टन मारवलच्या फिल्म ट्रेलरची फुटेज आहे तर त्याच वीडियो मध्ये एफ11 प्रो च्या स्लाईड्स पण टाकण्यात आल्या आहेत. याच स्लाइड्स वर एफ11 प्रो चे स्पेसिफिकेशन्स लिहण्यात आले आहेत.
ओपो एफ11 प्रो या वीडियो मध्ये पॅनोरेमिक डिस्प्ले वर बनलेला दिसत आहे तसेच हा फोन ट्रिपल ग्रेडिएंट कलर मध्ये सादर केला जाईल. वीडियो मधून समजले आहे कि एफ11 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाईल. तसेच हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल.
एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाईल जो 48 मेगापिक्सलचा असेल. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये पॉपअप कॅमेरा मिळेल. लीक नुसार एफ11 प्रो चा सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा असेल. वीडिये वरून समजले आहे कि ओपो एफ11 प्रो सुपर नाईट मोडला पण सपोर्ट करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दिसेल.
ओपो इंडिया च्या वीडियो वरून पण समजले आहे कि एफ11 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी ओपो एफ11 प्रो मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी वीओओसी 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने एफ11 प्रो फास्ट चार्ज करता येईल. ओपो येत्या 5 मार्चला एफ11 प्रो इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.
