OPPO बद्दल कालच माहिती समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ19’ सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन डिवाइस आणण्याची तयारी करत आहे जो OPPO F19 नावाने लॉन्च होईल. OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नंतर हा या सीरीजचा तिसरा स्मार्टफोन असेल जो इतर दोघांपेक्षा स्वस्त असेल. आज ओपो इंडियाने स्वतःहून हा फोन समोर ठेवत घोषणा केली आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन येत्या 6 एप्रिलला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. (OPPO F19 to launch in india on 6 april with 33w 5000mAh battery)
OPPO F19 चा लॉन्च ईवेंट 6 एप्रिल दुपारी 12 वाजता सुरु होईल जो स्टॅन्डअप कॉमेडियन जाकिर खान होस्ट करेल. कंपनी हा ईवेंट थेट प्रक्षेपित करेल आणि लॉन्च ओपोच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव दिसेल. मीडिया इन्वाइटमध्ये लॉन्च डिटेल सोबतच या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आली आहे ज्यात फ्रंट पॅनलवर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.
OPPO F19
ओपो एफ19 चे इतर डिटेल्स पाहता कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि OPPO F19 स्मार्टफोन स्लीक डिजाईनवर लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने फोनची स्क्रीन साईज तर सांगितली नाही पण स्पष्ट केले आहे कि ओपो एफ19 एमोलेड पॅनलवर बनला असेल आणि फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल.
OPPO F19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळा आहे. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर OPPO F19 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. तिन्ही कॅमेरा सेंसर जिथे एका बाजूला वर्टिकली देण्यात आले आहेत तर दुसऱ्या बाजूला सेंसर डिटेल सोबतच एलईडी लाईट आहे. फोटोवरून समजले आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा : 6 जीबी रॅम असलेला OPPO A74 वेबसाइटवर झाला लिस्ट, या महिन्यात होऊ शकतो लॉन्च
OPPO F19 Pro Plus 5G
ओपो एफ10 प्रो प्लस या सीरीजचा सर्वात मोठा आणि पावरफुल डिवायस आहे जो 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह लॉन्च झाला आहे. हा फोन एकाच वेरिएंटमध्ये बाजारात आला आहे पण हा फोन एफ19 प्रो प्रमाणे 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन भारतात 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
OPPO F19 Pro
ओपो एफ19 प्रो कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे ज्यात बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.
