Categories: बातम्या

29 फेब्रुवारीला भारतात येईल Oppo F25 Pro 5G, जाणून घ्या कधी होईल सेल आणि काय असेल स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • OPPO F25 Pro 29 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच.
  • फोनची सेल अ‍ॅमेझॉन भारताच्या माध्यमातून आहे.
  • फोन अ‍ॅमेझॉनवर मैरून आणि हलक्या निळ्या रंगात लिस्ट झाला आहे.


चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी Oppo भारतात लवकरच आपल्या F-सीरीजमध्ये एक OPPO F25 Pro ला लाँच करणार आहे. कंपनीने हा नवीन फोन सादर करण्यासाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. तसेच, ब्रँडने याची अधिकृत पुष्टी केली आहे की, ओप्पो एफ25 प्रो 5 जी ला भारतात 29 फेब्रुवारीला लाँच केले जाईल. तसेच अ‍ॅमेझॉनवर याचे डिजाइन आणि रंगाच्या पर्यायाचा खुलासा झाला आहे. बोलले जात आहे की हा डिव्हाइस भारतात आलेल्या OPPO F23 Pro 5G चे अपग्रेडे व्हर्जन असेल. चला या फोनबाबत अन्य महत्वपूर्ण माहिती पण तुम्हाला देऊ.

OPPO F25 Pro 5G ची डिजाइन

मायक्रोसाइटवर उपलब्ध अधिकृत फोटोमुळे पुष्टी झालेली आहे की ओप्पो F25 प्रो 5G मध्ये एक पंच-होल डिस्प्ले असेल, जो फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ शकतो. तसेच डिवाइसच्या बॅक पॅनलमध्ये ट्रिपल-कॅमेरा यूनिट आणि एक एलईडी फ्लॅश आहे. हा मैरून आणि हलक्या निळ्या या दोन रंगात विकला जाईल. या व्हेरिएंट्सचे अंतिम मार्केटिंग शेड्स आतापर्यंत समोर आले नाहीत.

OPPO F25 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले: भारतात येणारा OPPO F25 5G 6.7 इंच AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz PWM डिमिंग आणि 10-बिट कलर सारखे फिचर्स मिळू शकतात.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये चांगल्या अनुभवसाठी ब्रँड Mediatek Dimensity 7050 चिपसेटचा उपयोग करु शकते.
  • रॅम व स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाइसमध्ये 8 जीबी रॅम+ 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर 6 जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट पण दिला जाऊ शकतो.
  • रिअर कॅमेरा: OPPO F25 5G डिवाइस भारतात जबरदस्त ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. यात LED फ्लॅशच्या ओमनीव्हिजन OV64B प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा Sony IMX355 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन OV02B10 मॅक्रो कॅमेरा लावला जाऊ शकतो.
  • फ्रंट कॅमेरा: तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी 32-मेगापिक्सलची Sony IMX615 फ्रंट लेन्स मिळू शकते.
  • बॅटरी: फोनला चालविण्यासाठी यात 67W फास्ट चार्जिंगसह जास्त वेळ चालणारी 5,000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
  • आणखी: या नवीन ओप्पो फोनमध्ये कंपनी IP65 रेटिंग, ड्युअल सिम 5जी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय देण्यात आले आहे.
  • ओएस: OPPO F25 5G भारतात लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
Published by
Kamal Kant