Home बातम्या OPPO F27 सीरिजच्या पोस्टरमध्ये दिसली लाँचची तारीख, जाणून घ्या फोनची माहिती

OPPO F27 सीरिजच्या पोस्टरमध्ये दिसली लाँचची तारीख, जाणून घ्या फोनची माहिती

ओप्पो भारतीय बाजारात आपला एफ27 सीरिज लाँच करणार आहे. यात कंपनी OPPO F27 आणि OPPO F27 Pro आणि OPPO F27 Pro Plus सारखे तीन स्मार्टफोन लाँच करू शकते. विशेष म्हणजे प्रो मॉडेलमध्ये पहिल्यांदा भारतीय युजर्सना IP69 रेटींग फिचर मिळू शकतो. तसेच, ब्रँडने घोषणा करण्याआधी पोस्टर मध्ये लाँचची तारीख समोर आली आहे. चला, पुढे सादर होण्याची तारीख आणि संभावित फिचर्स सविस्तर जाणून घेऊया.

OPPO F27 सीरिज लाँचची तारीख (लीक)

ओप्पो एफ27 सीरिजच्या स्पेसिफिकेशन बाबत आतापर्यंत जास्त माहिती नाही. फोनची डिझाईन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केलेल्या ओप्पो ए3 प्रो सारखी वाटत आहे. त्याचबरोबर याला IP69 रेटिंगसह लाँच केले होते. हा मोठा संकेत आहे की ओप्पो एफ27 प्रो मोबाईल ए 3 प्रो चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. परंतु भारतात तीन मॉडेल येण्याची माहिती आहे, यामुळे हे स्पष्ट नाही की कोणता फोन रिब्रँडेड ओप्पो A3 प्रो बनेल.

OPPO F25 Pro चे स्पेसिफिकेशन

OPPO F25 Pro मोबाईलला यावर्षी फेब्रुवारी मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.