Home बातम्या 8जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4025एमएएच बॅटरी सह OPPO Find X2 Lite झाला लॉन्च

8जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4025एमएएच बॅटरी सह OPPO Find X2 Lite झाला लॉन्च

OPPO ने गेल्या महिन्यात टेक मंचावर आपली ‘फाइंड एक्स’ सीरीज वाढवत दोन नवीन फोन Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आलेले दोन्ही डिवाईस हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. आशा आहे कि ओपो आपली हि स्मार्टफोन सीरीज लवकरच भारतात पण लॉन्च करेल. पण फाइंड एक्स2 आणि एक्स2 प्रो भारतात आणण्याआधी ओपोने सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने OPPO Find X2 Lite टेक मंचावर सादर केला आहे. हा सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

OPPO Find X2 Lite पोर्तुगाल मध्ये लॉन्च केला गेला आहे. ओपोने आपल्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून हा फोन ऑफिशियल केला आहे. सर्वात आधी फोनची किंमत पाहत पोर्तुगालच्या वेबसाइट वर ओपो फाइंड एक्स2 लाइट एकाच वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह येतो जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 500 यूरो लिस्ट करण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार 41,000 रुपयांच्या आसपास आहे. वेबसाइट वर फोन पर्ल व्हाईट आणि मूनलाईट ब्लॅक कलर मध्ये सादर केला गेला आहे.

डिजाईन

OPPO Find X2 Lite वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनलेला दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. OPPO Find X2 Lite चा बॅक पॅनल पाहता इथे क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश आहे तसेच सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही. फाइंड एक्स2 लाइटच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

OPPO Find X2 Lite 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.4 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च झाला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो.

फोटाग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल + मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मोनोक्रोम लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी OPPO Find X2 Lite मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO Find X2 Lite सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि या टेक्नॉलजीच्या माध्यमातून फोन 20 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. फांइड एक्स2 सीरीज मध्ये भारतात केव्हा एंट्री घेईल याची वाट बघावी लागेल.