OPPO बाबत अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपली ‘फाइंड एक्स’ सीरीज वाढवत नवीन फोन सादर करण्याची योजना बनावत आहे. हा फोन Oppo Find X2 चा लाइट वर्जन असेल. अलीकडेच टेक वेबसाइट प्राइस बाबा वर Oppo Find X2 Lite स्मार्टफोनची रेंडर ईमेज दिसली होती. आता फोनचे स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि नवीन फोटो समोर आले आहेत.
डिजाइन
जर्मन टेक ब्लॉग Winfuture ने OPPO Find X2 Lite चे रेंडर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे. समोर आलेल्या रेंडर्सनुसार फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनलेला दिसत आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे.
OPPO Find X2 Lite च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश आहे तसेच सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही. तसेच फाइंड एक्स2 लाइटच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
OPO Find X2 Lite 5G फोन असेल, ज्यात 6.4-इंचाचा AMOLED पॅनल दिला जाईल. ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल असेल. तसेच फोन मधील चिपसेट 7nm स्नॅपड्रॅगॉन 765G असेल, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5G X52 मॉडेम असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि नॉन-एक्सपांडेबल 128GB स्टोरेज दिली जाईल.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये f/1.7 अपर्चर असलेला 48MP 1/2.0-इंच मेन सेंसर, f/2.2 अपर्चर असलेला 8MP अल्ट्रावाइड सेंसर, 2MP मॅक्रो सेंसर आणि 2MP डेप्थ सेंसर असेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा असेल.
पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,025mAh ची बॅटरी दिली जाईल जी 30W वायर चार्जिंग आणि नो वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल. तसेच फोन Color OS 7.0 सह एंडरॉयड 10 वर चालेल.
किंमत
रिपोर्टनुसार Oppo Find X2 Lite यूरोप मध्ये ब्लॅक आणि वाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाऊ शकतो. डिवाइसच्या किंमतीबाबत बोलले जात आहे कि हा €500 (जवळपास 42,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. डिवाइसच्या लाँन्चच्या वेळी समजेल कि फोन कोणत्या किंमतीत सादर केला जाईल.
