OPPO ने मार्च मध्ये ग्लोबल टेक मंचावर आपली ‘फाइंड एक्स’ सीरीज वाढवत Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले होते जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. अंर्तराष्ट्रीय बाजारात एंट्री येताच प्रश्न समोर येत होता कि हे फोन्स इंडियन मार्केट मध्ये कधी येतील. आता प्रश्नाचे उत्तर पण समोर आले आहे. ओपोने OPPO Find X2 सीरीज भारतात टीज केली आहे आणि आता सीरीजचे दोन्ही फोन्स लवकरच बाजारात विक्रीसाठी पण उपलब्ध होतील.
OPPO Find X2 सीरीज शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर प्रदर्शित केली गेली आहे. अमेझॉन वर ‘ओपो फाइंड एक्स2’ सीरीजचे प्रोडक्ट पेज लाईव केले गेले आहे. कंपनीने सीरीजच्या लॉन्च डेटची घोषणा अजून केली नाही पण ‘नोटिफाई मी‘ चा पर्याय सादर केला आहे. तसेच ओपो इंडियाने आपल्या ट्वीटर हँडेल वर पण ‘कमिंग सून‘ टीज केले आहे. अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर Oppo Find X2 आणि Find X2 Pro च्या फोटो सोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण दिसत आहेत. हे दोन्ही फोन आता भारतीय बाजारात लॉन्च होण्यास तयार आहेत, बस Oppo कडून लॉन्च डेट घोषित होण्याची वाट बघितली जात आहे.
For the first time ever, experience life like colors and smoothness on a phone screen. Introducing the #OPPOFindX2 with its billion color, 120Hz Ultra Vision Screen.
Get ready for the #TrueFlagshipExperience!
Get Notified: https://t.co/9ckLNJDdGk pic.twitter.com/SjZsVYEDXD— OPPO India (@oppomobileindia) May 13, 2020
ओप्पो फाइंड एक्स2 मध्ये 6.7-इंचाचा एमोलेड डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 असलेला पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. एंडरॉयड 10 सह या फोन मध्ये पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 12GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज वाढवता येत नाही. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी सुपर फास्ट 65 वॉट चार्जिंग आउटपुट सपोर्ट असलेली 4,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट पण आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर याच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मागे असलेल्या कॅमेरा सिस्टम मध्ये एक 48MP वाइड अँगल कॅमेरा सोनी IMX586 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/1.7 आहे. तसेच अल्ट्रा नाइट मोड 3.0 12MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सोनि IMX708 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तसेच फोन मध्ये 13MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. फ्रँटला वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
फाइंड एक्स 2 प्रो पाहता कंपनीने हा 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 3168 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या क्यूएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो जो NSA/SA Dual Mode 5G सह येतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सोबतच हा फोन 65W SuperVOOC 2.0 Flash Charge टेक्नॉलॉजी असलेल्या 4,260एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Find X2 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अर्पचर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX689 सेंसर देण्यात आलेला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अर्पचर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX586 अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि एफ/3.0 अर्पचर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या पेरिस्कोप टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी ओपो फाइंड एक्स2 प्रो मध्ये एफ/2.4 अर्पचर असलेला 32 मेगापिक्सलचा Sony IMX616 सेंसर देण्यात आलेला आहे.
Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro स्मार्टफोनच्या इंडिया लॉन्चची तारीख समजल्यास वाचकांना कळवण्यात येईल.
ओपो फाइंड एक्स2 प्रो वीडियो
