Home बातम्या 16 जीबी पर्यंत रॅम, 5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह जागतिक स्तरावर लाँच झाला Moto G75 5G, जाणून घ्या किंमत

16 जीबी पर्यंत रॅम, 5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह जागतिक स्तरावर लाँच झाला Moto G75 5G, जाणून घ्या किंमत

मोटोरोलाने अधिकृतपणे पश्चिम युरोपमध्ये Moto G75 5G लाँच केला आहे. याला लवकरच भारतासह इतर देशांमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे हा फोन स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिप द्वारे चालणारा जगातील पहिला फोन आहे. यात सहा वर्षांचे सॉफ्टवेअर/सुरक्षा अपडेट्सचा सपोर्ट मिळणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. चला, पुढे Moto G75 5G चे स्पेसिफिकेशन आणि किंमत याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

Moto G75 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Moto G75 5G मध्ये 6.78 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. त्यावर गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. यासोबतच हा एफएचडी+ रिझोल्यूशन, 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करत आहे.

प्रोसेसिंग: Moto G75 5G ला शक्ती देणाऱ्या 4nm स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपचा वापर करण्यात आला आहे. हे 4x 2.4 गिगाहर्ट्स कॉर्टेक्स-ए78 आणि 4x 1.8 गिगाहर्ट्झ कॉर्टेक्स-ए55 कोर कॉन्फिगरेशन ने सुसज्ज आहे. तर, फोन MyUX सह अँड्राईड 14 वर चालतो. ब्रँडने त्याला पाच ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याची घोषणा केली आहे.

स्टोरेज आणि रॅम: मोबाईलमध्ये कंपनीने 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली आहे. यामध्ये 8 जीबी रॅमला रॅम बूस्ट तंत्रज्ञानाने वाढवता येऊ शकते ज्याच्या मदतीने एकूण 16 जीबीची पॉवर मिळत आहे. एवढेच नाही तर डिव्हाईसमध्ये मेमरीला वाढवण्यासाठी एक्सपॅंडेबल सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

कॅमेरा: कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Moto G75 5G मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. तर मागील पॅनलवर ओआयएस सह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि फ्लिकर सेन्सर सेटअप मिळत आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी कंपनीने Moto G75 5G मध्ये 5000एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे. ही मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी 30 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.

इतर: फोन पाणी आणि धूळ-प्रतिरोधक IP68 रेटिंग आणि MIL-STD-810H रेटिंगसह येतो. यात सुरक्षेसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ऑडिओसाठी डॉल्बी ॲटमॉस ड्युअल स्पीकर, कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि यूएसबी-सी पोर्ट दिला गेला आहे.

वजन आणि डायमेशन: Moto G75 चे व्हेगन लेदर असलेल्या मॉडेलचे डायमेशन 166.09 x 77.24 x 8.44 मिमी आणि वजन 208 ग्रॅम आहे. तर मॅट फिनिश असलेला पर्याय 166.09 x 77.24 x 8.34 मिमी आणि 205 ग्रॅमचा आहे.

Moto G75 5G ची किंमत

Moto G75 5G चारकोल ग्रे (मॅट), एक्वा ब्लू आणि सक्क्युलंट ग्रीन (व्हेगन लेदर) अशा तीन रंगांमध्ये जागतिक स्तरावर लाँच झाला आहे. येथे त्याची किंमत 369 युरो म्हणजेच जवळपास 27,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, हँडसेटची विक्री येत्या 5 नोव्हेंबरपासून सुरू होईल.