Home बातम्या OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Highlights
  • OPPO K11 5G मध्ये OLED पॅनल मिळेल.
  • हा फोन ड्युअल टोन फिनिशसह येईल.
  • ह्यात Snapdragon 782G प्रोसेसर दिला जाईल.

मोबाइल निर्माता ओप्पो 25 जुलैला आपला के-सीरीज स्मार्टफोन OPPO K11 5G घेऊन येत आहे. डिवाइसची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर बाजारांमध्ये हा फोन लाँच केला जाईल. आता कंपनीनं लाँचपूर्वीच डिवाइसचे प्रमुख स्पेसिफिकेशन टीजरच्या माध्यमातून शेयर केले आहेत. ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G लाँच डिटेल

ओप्पो ‘के’ सीरीजमध्ये येणारा हा स्मार्टफोन 25 जुलैला चीनमध्ये लाँच होईल. फोनचा लाँच इव्हेंट चीनमध्ये दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा इव्हेंट होईल. इंडियन मोबाइल युजर देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ओप्पो के11 5जी लाँच लाइव्ह पाहू शकतील.

OPPO K11 5G डिजाइन

फोनची डिजाइन पाहता डिवाइस फ्लॅट पॅनलसह येईल. डिस्प्लेवर पंच होल कट आउट डिजाइन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या बाजूला पातळ बेजल्स दिसत आहेत. बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यात कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच फोन ड्युअल टोन कलर फिनिशसह दिसत आहे. त्याचबरोबर ओप्पोची ब्रँडिंग पण देण्यात आली आहे.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)