Oppo K7x कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर किंमत आणि स्पेसिफिकेशन सह लिस्ट केला आहे. याच्या लॉन्चची घोषणा चीनी माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर पण करण्यात आली आहे. ओप्पो के7एक्स कंपनीने मिड-रेंज 5G कॅटेगरी मध्ये सादर केला आहे. फोनच्या वैशिष्ट्यांमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेलेल्या एलसीडी डिस्प्लेचा पण समावेश आहे. वीबो वर करण्यात आलेल्या घोषणेनुसार, फोन चीनच्या सर्वात मोठ्या वार्षिक सेल 11.11 वर डिस्काउंट मध्ये विकला जाईल.
डिस्प्ले
ओप्पो के7एक्स स्मार्टफोन मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 90.5 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो सह 6.50-इंचाचा फुल-एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सेल्फीसाठी होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी 405 पीपीआई आहे आणि 600 नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळते.
हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 90हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन OPPO A33 भारतात लॉन्च
कॅमेरा
Oppo K7x मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात एफ/1.7 लेंस सह 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अल्ट्रा वाइड अँगल लेंस सह 8-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर आणि एफ/2.4 लेंस सह 2-मेगापिक्सलचे मॅक्रो आणि पोर्ट्रेट सेंसर मिळतात. सेल्फीसाठी फोन मध्ये एफ/2.0 लेंस सह 16-मेगापिक्सल सेंसर मिळतो, जो होल-पंच डिस्प्लेच्या आत आहे.
पावरफुल बॅटरी
OPPO K7x मध्ये मोठी 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये वाय-फाई, ब्लूटूथ 5.0, 5जी, 4जी एलटीई, जीपीएस, ग्लोनास, 3.5 एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी समवेत अनेक ऑप्शन मिळतात. सेंसर पाहता, फोन मध्ये जियोमॅग्नेटिक, लाइट, डिस्टेंस, जायरोस्कोप, एक्सलरेशन इत्यादी सेंसर देण्यात आले आहेत. फोन अँड्रॉइड 10 वर आधारित ColorOS 7.2 कस्टम स्किन वर चालतो.
हे देखील वाचा : OPPO A15 भारतात लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये आहे 4230एमएएच बॅटरी, 13एमपी कॅमेरा आणि 3जीबी रॅम
हार्डवेयर
Oppo K7x मीडियाटेक डायमेंसिटी 720 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे, जो 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह येतो. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येणार नाही.
किंमत
Oppo ने चीनी माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर माहिती दिली आहे कि ओप्पो के7एक्स च्या एकमेव 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,399 चीनी युआन (जवळपास 15,600 रुपये) आहे. फोन ब्लू शॅडो आणि ब्लॅक मिरर रंगात विकला जाईल.
