टेक कंपनी ओपो अंर्तराष्ट्रीय बाजारासह भारतात पण चांगला कन्ज्यूमर बेस ठेऊन आहे. वेगवेगळ्या सीरीज मध्ये शानदार मॉडेल्स सादर करणार्या ओपो ने भारतात आपल्या नव्या सब-ब्रांड ची सुरुवात केली आहे. ओपो ने भारतात ‘रियलमी’ लॉन्च केला आहे. ब्रांड ची सुरवात ओपो ने प्रसिद्ध शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मिळून केली आहे आणि ‘रियलमी 1’ स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन येणार्या 15 मे पासून शॉपिंग साइट अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.
रियलमी ओपो चा आॅनलाईन सब-ब्रांड आहे. या ब्रांड अंतर्गत लॉन्च केल्या जाणार्या पहिल्या स्मार्टफोन चे नाव रियलमी 1 ठेवण्यात आले आहे. कंपनी ने हा फोन यूथ सेंट्रिक असल्याचे सांगितले आहे. रियलमी 1 च्या स्पेसिफिकेशन्स व किंमती साठी आपल्याला 15 मे ची वाट बघावी लागेल. पण या फोन साठी अमेजॉन इंडिया वर वेबपेज बनवण्यात आले आहे जिथे फोन ची काही माहिती उपलब्ध आहे.
रियलमी 1 ब्लॅक डायमंड कलर वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे ज्यावर कटिंग एज टेक्निक चा वापर करण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह राउंड शेप चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि डाव्या पॅनल वर पावर बटन दिला गेला आहे. फोन च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, असे वाटते की तो फ्रंट पॅनल वर होम बटन मध्ये असू शकतो.
हा फोन 9,000 पासून 13,000 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. ओपो च्या नवीन ब्रांड रियलमी च्या रियलमी 1 स्मार्टफोन च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमती साठी 15 मे ची वाट बघावी लागेल. एवढे निश्चित आहे की हा फोन अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.
