Home बातम्या 50MP Selfie कॅमेरा आणि 12GB RAM सह Quad Curved स्क्रीन असलेला OPPO Reno 12 Pro भारतात लाँच

50MP Selfie कॅमेरा आणि 12GB RAM सह Quad Curved स्क्रीन असलेला OPPO Reno 12 Pro भारतात लाँच

ओप्पो रेनो 12 5 जी सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीकडून दोन पावरफुल स्मार्टफोन OPPO Reno 12 5G आणि OPPO Reno 12 Pro 5G भारतीय बाजारात आणण्यात आले आहेत. स्टायलिश लूक, अ‍ॅडव्हान्स फिचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन सोबत या मोबाईलमध्ये OPPO AI ची ताकद पण प्राप्त आहे. तसेच ओप्पो रेनो 12 प्रो ची किंमत, फिचर्स व स्पेसिफिकेशनची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO Reno 12 Pro ची किंमत

ओप्पो रेनो 12 प्रो 5 जी फोन 12 जीबी रॅमवर लाँच झाला आहे ज्याच्या 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे तसेच 512 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 40,999 रुपये आहे. या ओप्पो मोबाईलला Sunset Gold आणि Space Brown कलरमध्ये विकत घेता येईल. बँक कार्डवर कंपनीकडून 4000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक तसेच 9 महिन्याचा नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.

OPPO Reno 12 Pro ची डिझाईन

OPPO Reno 12 Pro चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

ओप्पो रेनो 12 प्रो स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्योवर बनला आहे जो 2412 × 1080​ पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7-इंचाच्या FHD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा AMOLED पॅनलवर बनलेली पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे ज्याला कंपनीने Quad Curved Infinite View स्क्रीन नाव दिले आहे. या डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट, 1200nits पिक ब्राईटनेस तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी मिळते. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ​ची लेअर आहे.

प्रोसेसर

OPPO Reno 12 Pro MediaTek Dimensity 7300-Energy ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे. ही 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.5GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवते. तसेच ग्राफिक्ससाठी या ओप्पो मोबाईलमध्ये एआरएम Mail-G615 GPU देण्यात आला आहे.

मेमरी

ओप्पो रेनो 12 प्रो 5 जी फोन 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम देण्यात आली आहे जो फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 24GB RAM ची ताकद प्रदान करतो. तसेच फोनमध्ये 512 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 1TB मेमरी कार्डला सपोर्ट मिळतो. रेनो 12 प्रो LPDDR4X RAM + UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

ऑपरेटिंग सिस्टम

ओप्पो रेनो 12 प्रो स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो ColorOS 14.1 सह मिळून चालतो. कंपनीने आपल्या नवीन मोबाईलला 3 वर्षाच्या ओएस अपग्रेडसह सादर केले आहे जो याला Android 17 रेडी बनविते. तसेच या स्मार्टफोनमध्ये 4 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट पण दिले जात आहे.

फ्रंट कॅमेरा

ओप्पो रेनो 12 प्रो 50MP Selfie Camera सह लाँच झाला आहे. हा Samsung S5KJN5 सेन्सर आहे जो एफ/2.0 अपर्चर वर चालतो. या ओप्पो मोबाईलमध्ये सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे तसेच रिल्स बनविण्यासाठी 0.64μm पिक्सल साईज लेन्सचा वापर करण्यात आला आहे जो 90° फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करतो तसेच ऑटो फोकस टेक्नॉलॉजीसह आहे.

कॅमेरा सँपल

बॅक कॅमेरा

OPPO Reno 12 Pro ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP Sony LYT600 मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 50MP Samsung S5KJN5 Telephoto लेन्स तसेच 8MP IMX355 ultra-wide अँगल लेन्स सह मिळून चालतो. हा कॅमेरा सेटअप OIS आणि 2X optical zoom ला सपोर्ट करतो.

बॅटरी

OPPO Reno12 Pro स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी कंपनीने आपल्या नवीन मोबाईल फोनला 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणले आहे. कंपनीने सांगितले आहे की हे कोणत्याही ‘रेनो’ फोनमध्ये दिलेल्या बॅटरी पेक्षा जास्त बॅकअप देण्याची क्षमता ठेवते .

OPPO Reno 12 Pro फिचर्स