ओप्पोचा बहुचर्चित Reno 12 सीरीज 12 जुलैला लाँच झाली आहे. ब्रँड द्वारे याचे दोन मोबाईल Oppo Reno 12 आणि Oppo Reno 12 Pro 5G भारतीय बाजारात सादर झाले आहेत. तसेच मागच्या अनेक दिवसांपासून दोन्ही डिव्हाईस बाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनी यावेळी नवीन AI टेक्नॉलॉजी, जबरदस्त कॅमेरासह डिझाईन घेऊन आली आहे.
Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro लाँच
- कंपनीने घोषणा केली होती की Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro डिव्हाईस 12 जुलैला दुपारी 12:00 लाँच करतील.
- मोबाईलसाठी कार्यक्रम व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर लाईव्ह दाखविण्यात आला होता.
OPPO Reno 12 सीरीजचे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: ओप्पो रेनो 12 आणि रेनो 12 प्रो मध्ये 6.7-इंचाचा FHD+ कर्व फ्लेक्सिबल अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. Reno12 5G च्या स्क्रीनमध्ये Gorilla Glass 7i चे प्रोटेक्शन लावण्यात आले आहे. तर Reno12 Pro 5G मध्ये Gorilla Glass Victus 2 असेल. तसेच, दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स ब्राईटनेस टेक्नॉलॉजीसह असतील.
- चिपसेट: रेनो 12 5 जी आणि रेनो 12 प्रो 5 जी फोन MediaTek Dimensity 7300-Energy चिपसेटसह सादर केला जाईल. फोनमध्ये AI परफॉर्मन्ससाठी MediaTek APU 655 पण आहे.
- रेनो 12 प्रो कॅमेरा: ओप्पो रेनो 12 प्रो 5 जी फोन ट्रिपल रिअर कॅमेरासह असेल. ज्यात OIS टेक्नॉलॉजीसह 50MP Sony LYT-600 प्रायमरी, 2x पोर्ट्रेट झूम आणि 20x डिजिटल झूम असलेला 50MP Samsung JN5 टेलीफोटो आणि 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाईड लेन्स मिळेल. तसेच, 50MP चा सेल्फी कॅमेरा असेल.
- रेनो 12 कॅमेरा: ओप्पो रेनो 12 मध्ये पण 50MP Sony LYT-600 प्रायमरी लेन्स दिली जाईल. परंतु यात 50 एमपी टेलीफोटो लेन्सच्या ऐवजी 2MP OV02B10 मॅक्रो सेन्सर आणि 8MP IMX355 अल्ट्रा-वाइड लेन्स दिली आहे. तसेच, 32MP GC32E2 चा सेल्फी सेन्सर दिला जाईल.
- बॅटरी: ओप्पो रेनो 12 आणि रेनो 12 प्रो फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळेल. त्याचबरोबर फास्ट चार्ज करण्यासाठी 80W SUPERVOOC टेक्नॉलॉजी दिली जाईल.
OPPO Reno 12 सीरीजची किंमत (संभाव्य)
Oppo Reno 12 5G बद्दल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की हा जवळपास 30 हजार रुपयांमध्ये एंट्री घेईल. ही याच्या बेस मॉडेलची किंमत असू शकते. तर Oppo Reno 12 Pro 5G जवळपास 40 हजार रुपयांमध्ये येण्याची शक्यता आहे.
