ओप्पो रेनो 12 सीरिज (OPPO Reno 12 series) ला लवकरच लाँच करण्याची तयारी सुरू आहे. या सीरिज अंतर्गत दोन मॉडेल लाँच होऊ शकतात, ज्यामध्ये रेनो 12 आणि रेनो 12 प्रो सहभागी होऊ शकतो. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये ओप्पो रेनो 12 प्रो चे काही खास स्पेसिफिकेशन ऑनलाईन लीक झाले होते. आता वीबोवर एक नवीन लीक समोर आला आहे, ज्यात ओप्पो रेनो सीरिजच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे.
या लीकमध्ये याव्यतिरिक्त, कोणतीही इतर माहिती समोर आलेली नाही. पहिले रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर, ओप्पो रेनो 12 प्रो मध्ये 6.7-इंचाचा 1.5K डिस्प्ले असू शकतो. हा फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 9200+ चिपसेटसह दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50MP टेलीफोटो सेन्सर व्यतिरिक्त 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा तिसरा कॅमेरा असू शकतो. तसेच सेल्फीसाठी यात 50MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. रेनो 12 प्रो मध्ये 5,000mAh ची बॅटरी असणार असल्याची बातमी समोर आली आहे.
ओप्पो रेनो 11 सीरिजला चीनमध्ये गेल्यावर्षी जून महिन्यामध्ये लाँच केले होते. अपेक्षा आहे की OPPO Reno 12 सीरिजला यावर्षी पण जून महिन्यामध्ये चीनमध्ये लाँच केले जाऊ शकते.