OPPO ने आज भारतीय बाजारात आपले रेनो डिवाईसेज वाढवत Oppo Reno 2 सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने या सीरीज मध्ये एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च केले गेले आहेत. Oppo Reno 2 भारतात लॉन्च होणार पहिला असा स्मार्टफोन आहे जो 20x digital zoom ला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन 36,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 20 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.
डिजाईन
Oppo Reno 2 कपंनीने सीरीजच्या आधीच्या स्मार्टफोन प्रमाणे फुल व्यू बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो शार्क फिन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही तसेच सेल्फीची कमांड देताच हा त्रिकोणी आकाराचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन बॉडीच्या बाहेर येऊन फोटो क्लिक करतो. Oppo Reno 2 ग्लॉस बॉडी वर बनला आहे जो कोर्निंग ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. वॉल्यूम रॉकर व पावर बटण फोनच्या साईड पॅनल वर देण्यात आले आहेत तर Oppo Reno 2 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.
कॅमेऱ्याची माहिती
Oppo Reno 2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो EIS Anti Shake टेक्नॉलॉजी सह चालतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 13-मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस, 8-मेगापिक्सलच्या 119-डिग्री अल्ट्रावाइड लेंस आणि 2-मेगापिक्सलच्या मोनो लेंस ला सपोर्ट करतो. Oppo Reno 2 20x Digital Zoom आणि 5x hybrid zoom सह खूप चांगले फोटो कॅप्चर करू शकतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Oppo Reno 2 मध्ये अल्ट्रा डार्क मोड देण्यात आला आहे जो कमी प्रकाशात व रात्री पण चांगले पिक्चर क्लिक करू शकतो. त्याचबरोबर Oppo Reno 2 चा कॅमेरा ‘एक्शन लेवल’ टेक्नॉलॉजी सह चालतो ज्यामुळे अल्ट्रा स्टेडी शॉट्स पण कोणत्याही डिफोकस विना कॅप्चर करता येतील. म्हणजे वीडियो घेताना जर हात किंवा कॅमेरा हलला तरीही वीडियो स्टेबलच कॅप्चर होईल.
स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 2 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.55-इंचाच्या फुलएचडी+ डायनामिक एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फ्रंट पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला 6 वापरण्यात आली आहे तर Oppo Reno 2 च्या बॅक पॅनल वर गोरिल्ला ग्लास 5 आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.1 टक्के आहे. Oppo Reno 2 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर 3.0 टेक्नॉलॉजी सह येतो त्यामुळे स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होईल.
इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo Reno 2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलरओएस 6.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट वर चालतो. भारतात हा स्मार्टफोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Oppo Reno 2 मध्ये LPDDR 4x रॅम आणि UFS2.1 टेक्नोलॉजी सपोर्ट आहे.
https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/08/OPPO-Reno-2-1.jpg
Oppo Reno 2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ 5.0 आणि एनएफसी सोबतच 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असेलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी केबल द्वारे सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इंडियन यूजर Oppo Reno 2 को ओशियन ब्लू आणि ल्यूमिनस ब्लॅक कलर मध्ये विकत घेऊ शकतील.
