Oppo येत्या 28 ऑगस्टला भारतात एक मोठा ईवेंट आयोजित करणार आहे ज्याच्या मंचावरून Reno 2 सीरीज लॉन्च केली जाईल. कंपनीने हि माहिती आधीच दिली आहे कि Reno 2 सीरीज मध्ये कंपनी क्वॉड रियर कॅमेरा असलेले ;वाला स्मार्टफोन लॉन्च करेल जे 20X Zoom ला सपोर्ट करतील. आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये Oppo Reno 2 सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा पण झाला आहे. एमएसपी ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि 28 ऑगस्टला Oppo Reno 2 सीरीज मध्ये OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF नावाने स्मार्टफोन लॉन्च केले जातील. या रिपोर्ट मध्ये तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण सांगण्यात आले आहेत ज्यांचा खुलासा इथे केला गेला आहे.
OPPO Reno 2
समोर आलेल्या रिपोर्ट नुसार OPPO Reno 2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा फोन कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह लॉन्च करेल तसेच फोनचा फ्रंट पॅनल गोरिल्ला ग्लास 6 व रियर पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. रिपोर्ट नुसार हा फोन 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज सह येईल जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल.
फोटोग्राफी साठी Oppo Reno 2 मध्ये एफ/1.7 अपर्चर वाला 48-एमपी चा प्राइमरी Sony IMX586 लेंस, 8-एमपी 116-डिग्री वाइड एंगल लेंस, 2x optical zoom क्षमता असेलेला 13-एमपी चा तिसरा सेंसर आणि एक 2-एमपी चा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी फोन मध्ये 16-एमपी शार्कफिन पॉप-अप कॅमेरा दिला जाणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट नुसार Oppo Reno 2 VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल.
OPPO Reno 2Z
Oppo Reno 2Z बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. हा मॉडेल पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. लीक नुसार Oppo Reno 2Z 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वर लॉन्च केला जाईल जो मीडियाटेकच्या हेलीयो पी90 चिपसेट वर चालेल.
या फोनच्या बॅक पॅनल वर 48-एमपी चा प्राइमरी Sony IMX586 सेंसर, 8-एमपी 119-डिग्री अल्ट्रावाइड लेंस सोबत दोन 2-मेगापिक्सलचे सेंसर मिळणार असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. Oppo Reno 2Z मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच लीकनुसार हा फोन पण VOOC 3.0 फ्लश चार्जिंग सपोर्ट असलेला 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल.
लीक मध्ये Oppo Reno 2F चे जास्त स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आलेले नाहीत पण असे निश्चित सांगण्यात आले आहे कि हा रेनो मॉडेल पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48-मेगापिक्सलचा Samsung ISOCELL Bright GM1 सेंसर असेल. लीक नुसार Oppo Reno 2 सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये एंडरॉयड 9 पाई सह कलरओएस 6.1 दिला जाईल जो एंडरॉयड 10 क्यू च्या अपडेट सह येईल.
किंमत
Oppo Reno 2 सीरीजची किंमत पाहता समोर आलेल्या लीकनुसार Oppo Reno 2 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. अशाप्रकारे Oppo Reno 2Z 25,000 रुपयांच्या आसपास तर Oppo Reno 2F 20,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. सीरीजच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 ऑगस्टची वाट बघितली जात आहे.
