Home बातम्या OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी

OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी

Oppo चा अपकमिंग स्मार्टफोन Reno 3 Pro अलीकडेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर टीज केला गेला होता. या टीजर मध्ये फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला होता. आता कंपनीने अधिकृत मीडिया इनवाइट पाठवून याला दुजोरा दिला आहे कि फोन 2 मार्चला लॉन्च होईल.

भारतात पाऊल टाकण्याआधी हा फोन चीन मध्ये 5G सपोर्ट सह गेल्या वर्षी लॉन्च झाला आहे. भारतात हा फोन फक्त 4G कनेक्टिविटी सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. ओप्पो रेनो 3 प्रो मधील डुअल होल-पंच सेल्फी कॅमेऱ्यामुळे फोटोजना बोके इफेक्ट देता येईल. चीन मध्ये रेनो 3 प्रो मॉडेल सिंगल होल-पंच कॅमेऱ्या सह लॉन्च केला गेला आहे. पण भारतात डिवाइस डुअल पंच होल कॅमेरा सह येईल. तसेच फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बनलेल्या माइक्रोसाइटच्या माध्यमातून कंपनीने रेनो 3 प्रो मध्ये दमदार कॅमेऱ्यांचा समावेश केल्याची माहिती मिळाली आहे.

स्पेसिफिकेशन्स

ओपो रेनो 3 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 44 मेगापिक्सलच्या डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च होईल. तसेच अलीकडेच हा डिवाइस गूगल कंसोल वर दिसला होता. त्या नुसार फोन मीडियाटेक पी95 चिपसेट आणि 8GB रॅम सह येईल.

OPPO Reno 3 Pro चीनी बाजारात लॉन्च झाला आहे पण भारतात येणारा मॉडेल चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल पेक्षा खूप वेगळा असेल. ओपो इंडियाचे वरिष्ठ अधिकारी तसलीम आरिफ यांनी असा खुलासा केला आहे कि भारतात ओपो रेनो 3 प्रो स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह लॉन्च केला जाईल.

चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. ओपो रेनो 3 प्रो चीन मध्ये एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो.

फोटाग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. चीन मधील Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या सिंगल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.