स्मार्टफोन्समध्ये आग लागल्याची आणि स्फोट होण्याच्या बातम्या सतत येत असतात. सुदैवाने अशा घटनांमध्ये जास्त जीवित हानी होत नाही परंतु काही घटना स्मार्टफोन युजर्सच्या मनात भीती निर्माण करून जातात. तसेच काही घटनांमुळे ग्राहक जखमी देखील होतात. Smartphone Blast ची अशीच एक वाईट वतनी कर्नाटकातील बेंगळुरूमधून समोर आली आहे जिथे मोबाईल वापरत असताना अचानक फोननं पेट घेतला आणि त्यात स्फोट झाला. ज्या स्मार्टफोनमध्ये स्फोट झाला त्याचे नाव आहे OPPO Reno2 असल्याचं सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं ते.
OPPO Phone Blast
ओप्पो रेनो 2 स्मार्टफोनमध्ये आग लागून स्फोट झाला आहे. ही भयंकर घटना Bengaluru मध्ये राहणाऱ्या युजर सोबत घडली आहे ज्याची संपूर्ण माहिती Vamshi नं आपल्या ट्वीटर हँडलवर दिली आहे. Mobile Phone catches fire आणि Smartphone Blast अशाप्रकारे शब्द आपण नेहमीच बातम्यांमध्ये ऐकत असतो. या घटना मोबाईल युजरसाठी खूप गंभीर आणि खतरनाक असतात तरीही मोबाईल ब्रँड आणि कंपन्या अशा दुर्घटनेचा दोष अनेकदा मोबाईल युजर आणि त्यांच्या फोन वापरण्याच्या पद्धतींना देतात. यावेळी देखील ओप्पोनं आपली जबाबदारी झटकली आहे.
स्मार्टफोनमध्ये लागली आग
OPPO Reno2 Blast च्या या प्रकरणात युजरनं दावा केला आहे की जेव्हा फोनमध्ये आग लागली तेव्हा तो फोनमध्ये कोणतंही हेव्ही प्रोसेसिंग किंवा गेमिंग करत नव्हता किंवा ओप्पोचा हा मोबाईल तेव्हा चार्जिंगवर देखील नव्हता. युजर आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरत होता आणि नॉर्मल चॅट बघत होता. WhatsApp वापरत असताना अचानक त्या मोबाईल फोनमध्ये आग लागली आणि अचानक स्फोट झाला.
— vamshi (@vamshi6421) July 7, 2022
ही घटना धक्कादायक होती अशी प्रतिक्रिया ट्विटर युजर vamshi6421 नं दिली आहे. कंपनीच्या कस्टमर सपोर्टकडून कोणतीही मदत न मिळाल्याचं त्याने सांगितलं आहे. तसेच त्यांनी अशाप्रकारच्या इतर घटना देखील त्याच्या निदर्शनास आल्या आहेत. कंपनीनं या बॅचमधील स्मार्टफोन्सकडे विशेष लक्ष देण्याची मागणी देखील त्याने केली आहे.
स्मार्टफोनमधील स्फोटाच्या अनेक घटनांमध्ये स्मार्टफोन चार्जिंगवर असणं, हेव्ही प्रोसेसिंग सुरु असणं किंवा स्मार्टफोन रिपेयरिंगसाठी ओपन केल्याच्या घटना जास्त असतात. अशावेळीच स्मार्टफोन गरम होण्याची शक्यता जास्त असते म्हणून बेंगळुरूमधील ही घटना खास आहे कारण इथे दैनंदिन आयुष्यातील काम करत असताना स्मार्टफोननं पेट घेतला आहे.
मोबाईलमध्ये आग लागल्यावर कंपनीची प्रतिक्रिया
ओप्पो रेनो2 स्मार्टफोनमध्ये आग लागून स्फोट होण्याच्या घटनेवर OPPO Care India कडून सांगण्यात आलं आहे की ‘मोबाईल फोनच्या अंतर्गत भागात जळाले नाहीत तसेच बाह्य भाग डॅमेज झाला आहे. त्यामुळे कंपनी या घटनेकडे स्फोट म्हणून बघू शकत नाही.’ अशी स्टेटमेंट चिनी कंपनी ओप्पोनं दिली आहे. या प्रकरणात पुढे काय होईल त्यांची माहिती देखील लवकरच बातमीत अपडेट करण्यात येईल.
