ओपोने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन सीरीज Oppo Reno 5 मध्ये नवीन मोबाईल Oppo Reno5 F सादर केला आहे. तत्पूर्वी कंपनीने Reno 5 सीरीज मध्ये Oppo Reno 5, Oppo Reno 5 Pro सारखे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Oppo Reno5 F सध्या केन्या मध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसर्या देशांमध्ये या फोनच्या लॉन्चबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. मोबाईलचे वैशिष्ट्ये पाहता याची डिजाइन रेनो 5 सीरीजच्या दुसऱ्या मोबाईल्स सारखी आहे आणि याच्या मागे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
डिजाइन
OPPO Reno5 F ची डिजाइन पाहता यात काही नवीन नाही. फोनच्या फ्रंटला पंच-होल देण्यात आला आहे जो टॉप-लेफ्ट कॉर्नरवर आहे. फोनच्या फ्रंटला होल-पंच असल्यामुळे डिवाइसच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. तर, बॉटमला जाड चिन पार्ट मिळेल. तसेच फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
Reno 5F मधील खासियत
ओपो रेनो5 एफ मध्ये पंच-होल डिजाइनसह 6.43-इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. ही फुल एचडी + रेजोल्यूशन, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 135 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 800 निट मॅक्सिमम ब्राइटनेस सपोर्टसह येते. तसेच फोनच्या गेम मोड मध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. स्क्रीन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी आहे.
तसेच फोन मध्ये MediaTek’s Helio P95 चिपसेट देण्यात आला आहे जो 2.2 GHz ऑक्टा-कोर सीपीयूसह चालतो. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB एक्सपांडेबल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी रेनो 5 एफच्या डिस्प्ले मध्ये पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रियर-फेसिंग कॅमेर्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा f / 1.7 अपर्चरसह, 8-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस 119-डिग्री FOV सह, 2-मेगापिक्सलची मोनो सेंसर पोर्ट्रेट शॉट्ससाठी आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे.
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,310 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 30W VOOC चार्जरला सपोर्ट करते. तसेच डिवाइस ColorOS 11.1 फ्लेवर्ड Android 11 OS वर काम करतो. तसेच या हँडसेटची साइज 160.1 x 73.2 x 7.8 mm आणि वजन 172g आहे.
किंमत
OPPO Reno5 F ची किंमत केन्या मध्ये KES 31,499 (~ $ 287) आहे. हा दोन कलर वेरिएंट्स म्हणजे फ्लुइड ब्लॅक आणि फॅन्टास्टिक पर्पल मध्ये सादर करण्यात आला आहे.
