इंटरनेशनल मार्केट मध्ये आपल्या लुक आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या टेक ब्रँड ओपोचा नवा 5G स्मार्टफोन OPPO Reno5 Pro आज भारतात लॉन्च झाला आहे. आकर्षक लुक आणि शानदार फीचर्स सह येणारा रेनो5 प्रो भारतातील पहिला स्मार्टफोन बनला आहे ज्यात मीडियाटेकचा 5जी चिपसेट डायमनसिटी 1000प्लस देण्यात आला आहे. OPPO Reno5 Pro 35,990 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो येत्या 22 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
डिस्प्ले
OPPO Reno5 Pro 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या 3डी कर्व्ड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा डिस्प्ले ओएलईडी पॅनल वर बनला आहे जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. ओपो रेनो5 प्रो ची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी 3डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे.
प्रोसेसिंग
ओपो रेनो5 प्रो स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 11 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 11.1 सह काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 1000+ चिपसेट देण्यात आला आहे. मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो आणि OPPO Reno5 Pro भारतात या चिपसेट वर लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच ग्राफिक्ससाठी रेनो5 प्रो मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.
फोटोग्राफी
OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेर्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी हा नवीन ओपो फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्याला सपोर्ट करतो.
बॅटरी बॅकअप
OPPO Reno5 Pro 4,350एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी ओपोने आपला नवा फोन 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 30 मिनिटांत बॅटरी झिरो ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.
किंमत व सेल
ओपो रेनो सीरीजचा पहिला 5जी फोन म्हणून आलेला OPPO Reno5 Pro भारतीय बाजारात एकच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातुन वाढवता येईल. कपंनीने हा फोन 35,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 22 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
