Home बातम्या OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली, कंपनीनं दिली माहिती

OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली, कंपनीनं दिली माहिती

OPPO आपले प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Reno सीरिजमध्ये सादर करते. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लेटेस्ट OPPO Reno8 सीरिज सादर करण्यात आली आहे, तेव्हापासून या सीरिजच्या भारतीय लाँचची वाट बघितली जात आहे. आता माहिती आली आहे की, OPPO Reno8 सीरीज भारतात 18 जुलैला एंट्री करेल. चिनी स्मार्टफोन कंपनीनं आपल्या आगामी रेनो सीरीजच्या इंडिया लाँचची तारीख सांगितली आहे.

Oppo Reno8 सीरीज 18 जुलैला भारतात संध्याकाळी 6 वाजता लाँच केली जाईल. या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण तुम्ही कंपनीच्या YouTube चॅनेलसह सोशल मीडिया हँडलवरून बघू शकता. भारतात OPPO Reno8 सीरीज अंतर्गत चीनमध्ये लाँच झालेले Oppo Reno 8 आणि Oppo Reno8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. भारतात येणारा OPPO Reno8 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Reno8 Pro+ चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही या सीरिजच्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OPPO Reno 8 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno8 Pro बद्दल चर्चा आहे की हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 8100 Max SoC सह येईल. सोबतीला फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी MariSilicon X प्रोसेसर देण्यात येईल, 4K अल्ट्रा नाईट व्हिडीओ शूटिंग सारखे फीचर्स जोडेल. Geekbench च्या लिस्टिंगमधून समजले आहे की या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. Oppo Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल.

कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर असेल. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP Sony IMX709 सेन्सर मिळेल. ओप्पोच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल.

OPPO Reno8 स्मार्टफोन या सीरिजमधील स्वस्त हँडसेट असेल. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1300 SoC मिळते, जिचा स्पीड 3GHz वर क्लॉक करण्यात आला आहे. Reno8 स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तसेच सेल्फीसाठी 32MP Sony IMX709 सेन्सर असेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जसह देण्यात येईल.

OPPO Reno 8 सीरीजची संभाव्य किंमत

Oppo Reno8 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात येऊ शकतात. यातील 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 29,999 रुपये असू शकते. 8GB रॅम व 256GB मॉडेल 31,990 आणि 12GB रॅम व 256 मॉडेल 33,990 रुपयांमध्ये सादर केला जाईल. तसेच Oppo Reno8 Pro स्मार्टफोन भारतात 42,000 ते 46,000 रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो.