Home बातम्या Oppo ने आणला जगातील सर्वात अनोखा फोन, स्क्रीनचा करता येईल कमी जास्त

Oppo ने आणला जगातील सर्वात अनोखा फोन, स्क्रीनचा करता येईल कमी जास्त

इनोवेशनच्या बाबतीत स्मार्टफोन निर्माता कंपन्या अनेक दिवसांपासून नव-नवीन प्रयोग करत आहेत. याच प्रयोगांचा परिणाम म्हणून आज आपल्यला अनेक अनोखे फोन्स दिसत आहेत, ज्यात पॉप-अप कॅमेरा, फोल्डेबल डिस्प्ले आणि बॅजल-लेस स्क्रीन सारख्या डिवाइसचा समावेश आहे. आता पर्यंत अनेक कंपन्यांनी असे डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स आणले आहेत. तसेच आता चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने एक असाच नवीन फोन सादर केला आहे, ज्याद्वारे कंपनीने डिस्प्ले इनोवेशन मध्ये एक पाऊल अजून पुढे टाकले आहे. कंपनीने रोलेबल डिस्प्ले असलेला कॉन्सेप्ट फोन Oppo X 2021 सादर केला आहे. हा रोलेबल डिस्प्ले असलेला जगातील जगातील पहिला फोन आहे आणि सिंगल टचने याच्या डिस्प्लेची साइज बदलता येईल.

Oppo ने Inno Day 2020 इवेंट मध्ये Oppo X 2021 सादर केला आहे. यात देण्यात आलेल्या यूनीक एक्सटेंड स्क्रीनच्या मदतीने फोनचा डिस्प्ले छोटा किंवा मोठा करता येईल. कंपनीचा म्हणणे आहे कि रोलेबल कॉन्सेप्ट टेक्नॉलजी असलेल्या या डिवाइसची डिस्प्ले साइज 6.7 इंचांवरून वाढवून 7.4 इंच केली जाऊ शकते. तसेच फोल्डेबल फोन्स प्रमाणे याच्या डिस्प्ले वर कोणतीही क्रीज दिसणार नाही.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2020/11/Oppo-x-2021.jpeg

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅम सह आला Oppo K7x 5G, जाणून घ्या याची किंमत

ओपो एक्स 2021 डिस्प्लेला सपोर्ट करण्यासाठी याआधी कधीच न बघितलेल्या मॅकॅनिज्म दिला आहे. कंपनीने आपल्या या कॉन्सेप्ट फोनसाठी एकूण 122 पेटेंट्स फाइल केले होते, त्यातल्या 12 चा वापर फक्त स्क्रोल मॅकॅनिज्मसाठी केला गेला आहे.

रोलेबल डिस्प्लेच्या मागे सॉलिड सपोर्ट स्ट्रक्चर देण्यात आला आहे. कंपनीने फोन मध्ये स्पेशल 2 इन 1 प्लेट डिजाइनचा वापर केला आहे जी डिस्प्ले छोटा किंवा मोठा होण्यासाठी त्याला सपोर्ट करते. OPPO नुसार कंपनीने Oppo X 2021 ची स्क्रीन चांगल्याप्रकारे सुरक्षित राहावी याची विशेष काळजी घेतली आहे. फोनची जाडी फक्त 0.1 मिमी आहे. कंपनीने अतिरिक्त प्रटेक्शनसाठी कस्टम मेड लैमिनेशन पण डिस्प्ले वर ऍड केले आहे.