Home बातम्या 50 कोटी पेक्षा जास्त झाली भारतात स्मार्टफोन यूजर्सची संख्या, तुम्ही पण आहात का यात

50 कोटी पेक्षा जास्त झाली भारतात स्मार्टफोन यूजर्सची संख्या, तुम्ही पण आहात का यात

भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या सर्व मोबाईल फोन निर्माता कंपन्या दुसऱ्या कंपनीला मागे टाकण्याच्या प्रयत्नांत आहेत. चीनी कंपन्या शाओमी आणि रियलमी सध्या इंडियन मार्केट मध्ये बजेट स्मार्टफोन्स मध्ये एकमेकांच्या मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत. तसेच एका रिपोर्टनुसार, भारतात आता 50 कोटी पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यावर्षी 2018 च्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे.

रिसर्च फर्म techARC ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार डिसेंबर 2019 पर्यंत इंडियन मार्केट मध्ये स्मार्टफोन यूजर्सची संख्या 502.2 मिलियन (50.22 कोटी) वर पोहोचली आहे. तसेच साल 2019 मध्ये स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत सॅमसंग टॉप वर राहिली आहे.

सॅमसंगचा मार्केट शेयर सर्वात जास्त 34 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर वर शाओमी 20 टक्क्यांसह आणि वीवो तिसऱ्या नंबर वर 9 टक्क्यांसह पोहचली आहे. techARC चे फाउंडर आणि चीफ अनॅलिस्ट फैजल कउसा यांच्या मते ‘गेल्या काही वर्षांपासून फीचर फोन यूजर्स कमी प्रमाणात स्मार्टफोन कडे वळले होते. पण या वेळी स्मार्टफोन कडे जास्त ग्राहक पोहचले आहेत.

या रिपोर्ट नुसार भारतात जास्तीत जास्त यूजर्स आपला पहिला स्मार्टफोन बेसिक सेग्मेंट (5001 ते 10,000 रुपयांपर्यंत) मध्ये विकत घेण्यास पसंती देतात. 2019 मधील कंपन्यांच्या यूजर बेस बद्दल बोलायचे तर रियलमीच्या यूजर बेस मध्ये 49 टक्के, वीवोच्या यूजर बेस मध्ये 44 टक्के आणि वनप्लसच्या यूजर बेस मध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.