Home बातम्या बदलला आहे Whatsapp, मेसेज गायब होण्यापासून पैसे पाठवण्यापर्यंत आले आहेत हे फीचर्स

बदलला आहे Whatsapp, मेसेज गायब होण्यापासून पैसे पाठवण्यापर्यंत आले आहेत हे फीचर्स

व्हाट्सऍप अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे कि इतरांच्या तुलनेत आपल्या युजर्सना एक चांगला एक्सपीरियंस कश्याप्रकारे देता येईल. यामुळे हा ऍप दुसऱ्या इन्स्टंट मेसेजिंग ऍप पेक्षा जास्त पॉप्यूलर आहे. WhatsApp ने गेल्या अनेक आठवड्यांपासून अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. कंपनीने भारतात पेमेंट फीचर पासून डिसअपीयरिंग मेसेज फीचरची पण सुरवात केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने अनेक नवीन फीचर्स सादर केले होते आणि यावर्षी पण हे चालू आहे. चला तर जाणून घेऊया व्हाट्सऍप मध्ये आलेल्या लेटेस्ट फीचर्स बाबत सर्वकाही.

डिसअपीयरिंग मेसेज फीचर

व्हाट्सऍप वर अलीकडेच मेसेज गायब होण्याचा फीचर सादर केला गेला होता. एखाद्या चॅटसाठी हे फीचर इनेबल केल्यानंतर तिथे पाठवलेले सर्व नवीन मेसेज 7 दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मेसेज गायब होण्यासाठी कोणतीही टाइम लिमिट सेट करता येत नाही.

व्हाट्सऍप पे-फीचर

कंपनीने भारतात आपल्या पेमेंट सर्विसची पण सुरवात केली आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्ही चॅट मध्ये मेसेज सोबतच व्हाट्सऍप वर पैसे पण पाठवू शकता. नवीन पेमेंट फीचर सेटिंग ऑप्शनच्या वर दिसेल. इथे तुम्हाला एकदा आपले अकाउंट डीटेल्स टाकल्यानंतर एक UPI पिन सेट करावा लागेल. त्यांनतर व्हाट्सऍप वर पैसे पाठवता येतील.

स्टोरेज मॅनेजमेंट टूल

स्टोरेजची समस्या दूर करण्यासाठी कंपनीने अलीकडेच स्टोरेज मॅनेजमेंट टूल सादर केला होता. याच्या माध्यमातून युजर्स आता सहज त्या फाइल्स ओळखू शकतात ज्या जास्त स्पेस घेतात आणि त्यांना डिलीट करू शकता.

Always Mute फीचर

हा ऑप्शन आल्यानंतर जर तुम्ही एखाद्या व्हाट्सऍप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्स मध्ये गेलात तर इथे 1 Week आणि 8 hours सह तुम्हाला तिसरा ऑप्शन Always चा दिसेल. आता पर्यंत Always च्या ऐवजी 1 Year चा ऑप्शन मिळत होता, म्हणजे तुम्ही एखादा ग्रुप जास्तीत जास्त 1 वर्षासाठी सेटिंग्स बदलून म्यूट करू शकत होता. पण, Always Mute आल्यानंतर आता तुम्हाला अनावश्यक नोटिफिकेशंस त्रास देणार नाहीत.