Home बातम्या केरळमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातल्या फोननं घेतला पेट; व्हिडीओ देखील आला समोर

केरळमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातल्या फोननं घेतला पेट; व्हिडीओ देखील आला समोर

Highlights
  • केरळमधील त्रिशुर मधील ही घटना
  • दुकानात बसून चहा पिताना फोननं घेतला पेट
  • एका महिन्यात केरळमध्ये तीन फोन ब्लास्ट

केरळमधील त्रिशुरमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातील फोन ब्लास्ट झाला आहे. ही घटना गुरुवार सकाळी 10 वाजता घडली आहे, जेव्हा इलियास नावाची व्यक्ती मारोटिचल भागातील एका दुकानात बसून चहा पीत होते. अचानक त्यांच्या खिशात एक स्फोट झाला आणि आग लागली. त्यांनी त्वरित आग विझवली. ह्या घटनेत इलियास ह्यांना कोणतीही दुखापत झाली आंही. एका महिन्यापेक्षा कमी काळात केरळमध्ये मोबाइल फोनमध्ये ब्लास्ट होण्याची ही तिसरी घटना आहे.

समचार एजेंसी पीटीआयनुसार, ह्या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. ओलूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम इलियास यांच्याशी फोनवरून चौकशी केली आणि घटनेची माहिती घेतली.

एक वर्षांपूर्वी घेतला होता फोन

इलियास यांनी सांगितलं की त्यांनी जवळपास वर्षभरापूर्वी 1000 रुपयांमध्ये फीचर फोन घेतला होता. त्यांचा फोन आतापर्यंत कोणत्याही समस्येविना ठीक सुरु होता. अचानक चहा पिताना फोनमध्ये स्फोट झाला आणि त्यांच्या खिशाला आग लागली.

गेल्या आठवड्यात देखील खिशात फोननं घेतला होता पेट

केरळमधील कोझिकोडमधील एका तरुणाच्या खिशात फोनचा याचंच स्फोट झाला होता. फोन गरम झाल्यानंतर अचानक त्यात आग लागली. परंतु त्या फोनचा पाच ते सहा महिन्यांपूर्वी डिस्प्ले रिपेयर करण्यात आला होता. याआधी केरळमध्ये फोन ब्लास्ट झाल्यावर 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेळेवेळी फोनमध्ये ब्लास्ट होण्याच्या बातम्या येत असतात.

फोनमध्ये आग लागण्याची कारणे