Home बातम्या 6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर

6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर

शाओमीने गेल्यावर्षी पोको फोनच्या रूपात आपला नवीन ब्रँड भारतीय बाजारात आणला होता. या ब्रँडची सुरवात पोको एफ1 स्मार्टफोनने झाली होती. ज्याने लॉन्च होताच यशाचे नवीन विक्रम केले होते. पोको एफ1 तेव्हा क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर सादर केला गेला होता. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन देशात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. आता आपल्या फॅन्सना भेट देत पोको इंडिया ने पोको एफ1 ची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे.

पोको इंडियाने पोको एफ1 च्या 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे. हा वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कंपनीने आधी या वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती त्यानंतर हा 22,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. आता 2,000 रुपयांच्या कपातीनंतर हा स्मार्टफोन 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लक्षात असू दे कंपनीने केलेला हा प्राइज कट कायमचा नाही आहे. पोको एफ1 चा 6जीबी रॅम वेरिएंट 25 मार्च पासून 28 मार्च पर्यंत या नवीन किंमतीत विकत घेता येईल.

पोको एफ1
पोको एफ1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने पोको एफ1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पोको एफ1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

भारतात पोको एफ1 तीन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. दोन वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात तर फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरीएंट 19,999 रुपये तसेच 8जीबी/128जीबी मेमोरी वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर 6जीबी/128जीबी स्टोरेज वेरिएंट सध्या 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.