Xiaomi सोबत असताना POCO चे Poco F1 स्मार्टफोनमुळे खूप कौतुक झाले होते. इंडियन युजर्सना हा फोन खूप आवडला होता, त्यानंतर पोको एक स्वतंत्र ब्रँड म्हणून समोर आला होता. गेल्या वर्षी अनेक प्रकारच्या लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी Poco F2 पण लॉन्च करेल, पण 2020 मध्ये असे झाले नाही. पण आता वाटत आहे कि पोको फॅन्सची इच्छा साल 2021 मध्ये पूर्ण होईल. कंपनीने एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात Poco F2 चा उल्लेख झाला आहे.
Poco ने नवीन वर्षाच्या सुरवातीला एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केला होता ज्यात Poco F2 चा उल्लेख केला गेला आहे. पोकोने या फोनच्या लॉन्च बाबत काही सांगितले नाही पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आशा आहे कि कंपनी लवकरच Poco F2 पण सादर करून याच्या लॉन्च डेटची माहिती देऊ शकते. साल 2021 मध्ये लॉन्च होणारा हा पहिला पोको फोन Poco F2 स्मार्टफोन असू शकतो.
The stage is set! The fun has begun! Let us get ready to take it to the next level!
Excited? You should be, coz the next year is going to be even crazier.
While we enjoy, let us look back at everything we've achieved together! Thank you ❤️ pic.twitter.com/K0432jSj8B
— POCO India (@IndiaPOCO) December 31, 2020
Poco F2
पोको एफ2 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, त्यात लॉन्चच्या टाईमलाईन पासून यातील स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला गेला आहे. या लीक्सनुसार पोको एफ2 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल आणि प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच क्वॉड रियर कॅमेऱ्यासह फोटोग्राफीसाठी पोको एफ2 मध्ये 4,250एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21
Poco F2 Pro
पोको एफ2 प्रो पाहता या फोन मध्ये 1080×2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो पॉप-अप डिजाईन वर बनला आहे. अँड्रॉइड 10 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 5जी प्रोसेसर वर चालतो. सोबतच फोन मध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅम सह 128GB व 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4700mAh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
POCO F2 Pro मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सल सोनी IMX686 प्राइमरी सेंसर OIS, 5 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस (3cm ~ 7cm ऑटोफोक्स मॅक्रो), 13 मेगापिक्सल 123-डिग्री अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेट मध्ये 20 मेगापिक्सल सेल्फी शूटर 120fps स्लो-मोशनल व्हिडीओ सपोर्ट देण्यात आला आहे.
व्हिडीओ
