Home बातम्या POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च

POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च

गेल्या वर्षीपासून पोकोच्या नव्या आणि दमदार फोन पोको F2 च्या लॉन्चची टेक विश्व आणि भारतीय चाहते वाट बघत आहेत. पण, 2020 मध्ये फोन लॉन्च झाला नाही. तसेच आता समोर आलेल्या माहितीनुसार वाटत आहे की यावर्षी ही प्रतीक्षा संपणार आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला होता कि हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स सह न येता मिड रेंज स्पेक्स सह येईल. रिपोर्ट्स नुसार हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो. तसेच आता टिप्सटर मुकुल शर्माकडे बोलताना Poco India चे डायरेक्टर अनुज शर्मा यांनी सांगितले कि अपकमिंग POCO F-Series फोन स्नॅपड्रॅगन 732G सह येणार नाही.

अनुज शर्मा यांनी स्पष्ट केले कि स्नॅपड्रॅगन 732G एक मिड-रेंज चिपसेट आहे जो आधीच POCO X3 मध्ये वापरण्यात आला आहे. F सीरीज कंपनीच्या एक्स सीरीज पेक्षा वर आहे, त्यामुळे शर्मा यांनी सुचवले आहे की POCO F2 एक शक्तिशाली, कदाचित एका फ्लॅगशिप-स्तरीय, चिपसेट सह येईल.

POCO F1 कंपनीने साल 2018 मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 SoC सह सादर करण्यात आला होता. POCO इंडियाच्या हेडनी वापरण्यात येणार्‍या चिपसेटचा खुलासा केला नाही, आपण अंदाज लावू शकतो की हा स्नॅपड्रॅगन 865 किंवा नवा स्नॅपड्रॅगन 888 SoC असू शकतो.

अनुज शर्मा यांनी सांगितले कि नव्या पोको स्मार्टफोनची किंमत पोको एफ1 च्या तुलनेत जास्त असेल कारण स्मार्टफोन Poco F1 च्या किंमतीत लॉन्च करने शक्य होणार नाही.

Poco F2

पोको एफ2 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, त्यात लॉन्चच्या टाईमलाईन पासून यातील स्पेसिफिकेशन्स पर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. या लीक्सनुसार पोको एफ2 स्मार्टफोन एंडरॉयड 11 वर लॉन्च केला जाईल. तसेच या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच क्वॉड रियर कॅमेर्‍यासह फोटोग्राफीसाठी पोको एफ2 मध्ये 4,250एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.