पोकोनं गेल्याच महिन्यात भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचे POCO F5 आणि POCO F5 Pro स्मार्टफोन लाँच केले होते जे दमदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी POCO F6 आणि POCO F6 Pro वर देखील काम करत आहे. एका लीकमध्ये ह्या दोन्ही फोन्सच्या मॉडेल नंबर तसेच स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची माहिती पुढे वाचता येईल.
पोको एफ6 सीरीज आयएमआय (लीक)
शाओमीयुआय कम्यूनिटीवर पोको एफ6 सीरीजची लिस्टिंग शेयर करण्यात आली आहे. इथे पोको एफ6 2311DRK48G आणि 2311DRK48I मॉडेल नंबरसह दाखवण्यात आला आहे ज्यात ‘I’ अक्षर इंडियन मार्केट दर्शवतो.
अशाप्रकारे आयएमआय डेटाबेसमध्ये पोको एफ6 प्रो स्मार्टफोनचा 23113RKC6G आणि 23113RKC6I मॉडेल नंबर समोर आला आहे. इथे देखील पहिला मॉडेल फोनचा ग्लोबल व्हर्जन सांगण्यात आला आहे तर दुसरा मॉडेल नंबर इंडिया व्हर्जन आहे.
पोको एफ6 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)
- लीकनुसार POCO F6 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होऊ शकतो.
- POCO F6 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपेसट असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर अद्याप बाजारात आलाच नाही.
- लीकनुसार हे सीरीज प्लास्टिक बॉडीसह नव्हे तर ग्लास किंवा लेदर टेक्स्चर बॅक कव्हरसह सादर केली जाऊ शकते.
- POCO F6 आणि POCO F6 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनी सुधारित टेलीफोटो लेन्स देऊ शकते जी जवळच्या वस्तू चांगल्या कॅप्चर करू शकेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल.
पोको एफ5 डिटेल्स
- 8GB RAM + 256GB Memory = 29,999 रुपये
- 12GB RAM + 256GB Memory = 33,999 रुपये
- स्क्रीन : फोनमध्ये 6.67 इंचाची मोठी पंच-होल स्क्रीन देण्यात आली आहे जी अॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्या डिस्प्लेवर 1000 निट्स ब्राइटनेस, 1920पीडब्ल्यूडी डिमिंग, आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.
- प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी पोको एफ5 मध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 7जीबी पर्यंतच्या वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्याच्या मदतीनं इंटरनल 12जीबी रॅम 19जीबी पर्यंत वाढवता येईल.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 1/2.0″ इंचाचा सेन्सर साईज असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी पोको एफ5 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की फक्त 30 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 30 तास कॉलिंग करू शकतो.
